लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी येथील महत्त्वाच्या मानपाडा आणि कासारवडवली येथील सेवा रस्त्यातून मुख्य रस्त्याला जोडणारे छेद रस्ते ठाणे वाहतुक पोलिसांनी बंद केले आहेत. या बदलामुळे मुख्य मार्गावरील कोंडीत काहीशी घट झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छेद रस्ते खुले असताना मुख्य मार्गावरील वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होत होती.

घोडबंदर मार्ग परिसरात गेल्याकाही वर्षांपासून नागरिकरण वाढले आहे. या मार्गावरून वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. तसेच भिवंडी आणि उरण जेएनपीटी येथून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांचा भार देखील या मार्गावर अधिक असतो. त्यामुळे मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची या मार्गावर वाहतुक होत असते. तसेच ठाण्याहून बोरीवली, मिरा रोड, दहिसर, वसईच्या दिशेने परिवहन सेवेच्या बसगाड्या वाहतुक करतात. वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे घोडबंदर मार्गावर काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य मार्ग अरुंद झाले आहेत.

आणखी वाचा-आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर शिंदे गटाचे नरेश म्हस्के चप्पल घालून? केदार दिघे यांचा घणाघाती आरोप

या मार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील छेद रस्त्याने काही वाहने मुख्य मार्गावर येत असतात. येथील मानपाडा चौक आणि कासारवडवली भागात याचा अधिक फटका बसतो. मानपाडा येथील बाजारपेठेतून हलकी वाहने, ट्रक, टेम्पो देखील सेवा रस्त्यावरून छेद रस्त्याने मुख्य मार्गावर वाहने येत असतात. त्यामुळे मानपाडा उड्डाणपुलाखालील चौकात वाहतुक कोंडी होत असते. त्याचा परिणाम घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर होऊन वाहतुक कोंडी होत होती. तसेच कासारवडवली भागातही वाहन चालक सेवा रस्त्यावरू मुख्य मार्गावरील वाहनांस अडथळा करत होते.

हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी बाजारपेठेतून मुख्य मार्गांवर येणाऱ्या छेद मार्गावर अडथळे बसविले आहेत. मानपाडा येथील बाजारपेठ आणि कासारवडवली येथील पेट्रोल पंप भागातून वाहतुक करणाऱ्या चालकांना काही अंतरपुढे जावून मुख्य मार्गावर प्रवास करता येत आहे. तसेच यामुळे चौकातील कोंडी काही प्रमाणात फुटली असून मुख्य मार्गावरून वाहतुक करणाऱ्या चालकांना दिलासा मिळाला आहे. छेद रस्ता बंद करताना स्थानिकांनी सहकार्य दाखविले त्यामुळे हे शक्य झाल्याचे वाहतुक पोलिसांचे म्हणणे आहे.

सेवा रस्त्यावरील छेद रस्त्यांमधून येणाऱ्या वाहनांचा मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत होता. त्यामुळे आम्ही बदल लागू केले आहेत. त्यांचा चांगला परिणाम दिसत आहे. -डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतुक पोलीस.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important junction roads on ghodbunder route closed some relief from congestion on main road mrj
First published on: 27-03-2024 at 10:02 IST