ठाणे : एकनाथ शिंदेंना पांडुरंगाच्या पूजेसाठी पंढरपूरचं आमंत्रण

मंगळवारी मंंदिर समितीचे सदस्य ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या लुईसावाडी येथील निवासस्थानी आले होते.

invitation for worship
( संग्रहित छायचित्र )

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पांडुरंगाच्या पुजेसाठी मंगळवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी सहपरिवारासह आमंत्रित केले. मंगळवारी मंंदिर समितीचे सदस्य ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या लुईसावाडी येथील निवासस्थानी आले होते. एकनाथ शिंदे यांना वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पाडुंरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते. यावर्षीच्या पूजेचा मान हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यासाठी श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी त्यांच्या लुईसवाडी येथील शुभ दीप निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामध्ये समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांना वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Invitation of eknath shinde to pandharpur for worship of panduranga amy

Next Story
ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळताच कल्याण-शीळफाटा, माणकोली पूल मार्गी लावा ; समाज माध्यमांवर नेटकऱ्यांची जोरदार चर्चा
फोटो गॅलरी