ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी २६ व २७ फेब्रुवारी रोजी सुट्टीच्या दिवशीही महावितरणच्या कल्याण परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय महवितरणने घेतला आहे. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून संभाव्य गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठीची कार्यवाही सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सगळे अधिकारी, कर्मचारी क्षेत्रीय कामगिरीवर राहणार आहेत. कल्याण परिमंडलात थकीत वीजबिल वसुलीसाठीची कार्यवाही सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल अ‍ॅप (App), http://www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित होण्याची संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali electricity payment center to stay open on holiday sgy