ठाणे : मुंब्रा येथील चुहा पूल भागात एका ६५ वर्षीय व्यक्तीने ठाणे खाडीमध्ये उडी मारल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती बचाव पथकाने दिली. ही व्यक्ती मुंब्रा येथील संजय नगर भागात कुटुंबियासोबत राहते. गेल्याकाही दिवसांपासून त्यांची मानसिक प्रकृती स्थिर नव्हती. रविवारी ते चुहा पूल भागात आले असता त्यांनी खाडीत उडी मारली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचे शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नाही.