ठाणे: वागळे इस्टेट भागातील रोड क्रमांक १६ येथे असलेल्या एका प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचे काम सुरु आहे. या कामा दरम्यान, बांधकाम सुरु असलेल्या प्लाॅटमधील एक झाड पडले. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. तर, झाड महावितरणाच्या विद्युत वाहिनीवर पडल्यामुळे या भागातील जवळपास ४५० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. हा विद्यूत पुरवठा आठ तासात सुरळित करण्यात येईल, अशी माहिती महावितरण कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वागळे इस्टेट भागातील नेहरु नगर परिसरात एऑन एअरस्पेस प्लॉट मधील वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामा दरम्यान, सोमवारी म्हणजेच आज या प्लाॅटमधील एक झाड पडल्याचा प्रकार घडला.  या घटनेत अमित पोपट पवार (३२) यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतू, हे झाड त्या ठिकाणी असलेल्या महावितरणाच्या केबर वाहिनीवर पडल्यामुळे केबल वाहिनी तुटल्या आहेत. तसेच विद्यूत पोलही पडला आहे. या घटनेमुळे वागळे इस्टेट भागातील नेहरु नगर परिसरातील सुमारे ४५० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तयारी दरम्यान विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person was injured due to the fall of the tree and the power supply was disrupted ysh