उल्हासनगरः उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी कल्याण बदलापूर राज्यमार्गावर पदपथ अडवणाऱ्या कार विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी दुकानदाराने पालिकेच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पालिकेने कारवाई सुरूच ठेवत सुमारे दहा फुटांचा रस्ता मोकळा केला आहे. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने रस्ते आणि विशेषतः कल्याण बदलापूर राज्यमार्ग अडवणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या रस्त्यावरील पदपथांवर कार विक्रेते , कार सजावटीची दुकाने आणि गॅरेजचे अतिक्रमण असते. कारवाईनंतर पुन्हा पदपथ अडवले जातात. पालिका प्रशासन समज देऊन काही वेळा दंडात्मक कारवाई करते. मात्र राजकीय वर्चस्व किंवा वशिला वापरून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे काम काही दुकानदार करतात. सातत्याने काही व्यापारी हे नागरिकांना असुविधा आणि त्रास होईल अशा पद्धतीने आपल्या वस्तू किंवा आपली वाहने रस्त्यावर विक्रीसाठी ठेवतात. याच रस्त्यावर कार गॅलेरीया नावाच्या दुकानदाराने अशाच प्रकारे पदपथाचा मोठा भाग अडवला होता.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: औरंग्याच्या अवलादी अचानक कुठून पैदा झाल्या ते आम्ही शोधतो आहोत-देवेंद्र फडणवीस

गटारावर ओटा बांधून त्यावर कार विक्रीसाठी उभ्या केल्या जात होत्या. या दुकानाबाहेर दहा फूट रस्ता अडत असल्यामुळे नागरिकांना वाहने वळवण्यास आणि चालण्यास अडथळा निर्माण होत होता. अखेर बुधवारी उल्हासनगर महापालिकेने या मुजोर दुकानदारावर धडक कारवाई करत सुमारे दहा फुटांचा पदपथ मोकळा केला आहे. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे गणेश शिंपी यांनी ही कारवाई केली. यावेळी कारवाई करण्यास गेले असता आपल्या राजकीय लागेबांध्यामुळे प्रभागातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न दुकानदाराने केला. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली. अखेर हा मार्ग मोकळा झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take action against the car seller who blocks the footpath ysh