ठाणे : सारे जहाँ से अच्छा या गीतामध्ये हम जो शब्द आहे हा शब्द मुस्लिमांना म्हंटला आहे. पण आम्ही हिंदू हे कधी समजू शकलो नाही, कारण आमचे पहिले पंतप्रधान जॉनी जॉनी एस पापा होते. ते तेच शिकून आले होते. त्यामुळे आम्ही देखील तेच ऐकले असे भाजपा नेते डॉ. सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शताब्दी जयंती समारोह समिती यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. अहिल्यादेवींना मानवंदना देताना त्यांचे कार्य आणि विचार आजच्या काळातही मार्गदर्शक असल्याचे डॉ. सुनील देवधर यांनी स्पष्ट केले.
यावेळी ते म्हणाले की, धनगर समाजातून आलेल्या या तेजस्वी महिलेने राणी म्हणून देशात नावलौकिक मिळवला. तसेच आज मोदींनी महिलांसाठी , सैन्यात दलात संधी, ऑपरेशन सिंदूरसारखे पाऊल उचलले हे सर्व अहिल्यादेवी होळकरांमुळे शक्य झाले. त्याचबरोबर डॉ. देवधर यांनी अहिल्यादेवींच्या काळातील सामाजिक सुधारणांवर प्रकाश टाकला. तसेच स्त्रीधन हे नेहमीच महिला कुटुंबियांच्या हितासाठी वापरतात. स्त्रीधनाचा वापर करून त्यांनी सुमारे १६ कोटी रुपयांचे सामाजिक कार्य केले, असे ते म्हणाले.
आज पंतप्रधानामुळे राज्याचा विकास होतोय. एखाद्याला खरोखर नेता बनायचे असेल तर त्याच्यापुढे अहिल्यादेवींचा आदर्श ठेवला पाहिजे. मुलींना नाचायला नंतर आधी शिक्षण शिकवा. त्यासोबतच भविष्यामध्ये कोणाचे सिंदूर पुसणार नाही असे काम मोदींनी केले आहे हे अहिल्यादेवी मुळे शक्य झाले आहे. तसेच आपल्या देशातील नेत्यांवर श्रद्धा ठेवा हेच आपल्याला वाचवणार आहेत, देशाला विश्वगुरू करणार आहेत. थोडी सबुरी ठेवा जरा काही मनाविरुद्ध घडले की लगेच समाज माध्यमांवर आपल्याच नेत्याविरोधात तलवारी चालवण्याचे काही कारण नाही असे डॉ. देवधर यांनी सांगितले.