ठाणे : मुंब्रा येथील कौसा भागात शासकीय जमीनींवर उभ्या राहिलेल्या पाच अनधिकृत इमारतींवर सोमवारी ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेकडून कळवा, मुंब्रा, दिवा भागात कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा >>> सात प्रकल्पांचा खर्च फुगण्याची शक्यता; १४ हजार कोटींच्या कंत्राटांच्या वाटपानंतर ‘पुनर्विलोकन’चा घाट

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार मागील काही दिवसापासून कळवा, मुंब्रा, दिवा या भागात महापालिकेकडून अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जात आहे. सोमवारी कौसा येथील खान कपाऊंडमध्ये शासकीय जागेत उभारण्यात आलेल्या तळ अधिक तीन मजल्याच्या पाच इमारतींवर ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई केली.