Namo Grand Central Park ठाणे : ठाण्याच्या नमो ग्रँड सेंट्रल पार्क चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. शाश्वतता, उत्तम रचना आणि सर्वसमावेशक मनोरंजन यांचा मिलाफ असलेले हे २५ एकर क्षेत्राचे उद्यान, आपल्या नावीन्यपूर्ण भूदृश्य स्थापत्यशास्त्र (landscape architecture) आणि लोकाभिमुख दृष्टीकोनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.
ठाणे शहराच्या वसलेल्या या ऐतिहासिक शहरी हरितक्षेत्रच्या पार्कला लँडस्केप डिझाईन – पार्क आणि सार्वजनिक जागा, शैक्षणिक, समुदाय आणि मनोरंजन सुविधा या श्रेणीमध्ये प्रतिष्ठित डीएनए पॅरिस डिझाइन पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे.
पॅरिसमध्ये जाहीर झालेल्या या पुरस्कारामध्ये आर्किटेक्चर, इंटिरिअर, लँडस्केप व शहरी नियोजन अशा विविध विभागांतील सर्वोत्तम रचनांचा गौरव केला जातो. कल्पतरू लिमिटेडने विकसित केलेल्या आणि ठाणे महापालिकेच्या दृष्टीकोनातून उभारलेल्या या उद्यानात भारतातील सर्वात मोठे स्केट पार्क, ३ एकरचे कृत्रिम तलाव, फिटनेस आणि विश्रांती क्षेत्र, अँफीथिएटर, उंच पूल आणि ३,५०० हून अधिक वृक्ष असलेले वनस्पती मार्ग (botanical trails) आहेत. ज्यामुळे ठाण्याच्या पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण ऑक्सिजन झोन तयार झाला आहे.
“नमो ग्रँड सेंट्रल पार्कला डीएनए पॅरिस डिझाईन अवॉर्डसारखा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाल्याचा आम्हांला अभिमान आहे,” असे कल्पतरू लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पराग मनोत यांनी सांगितले. हा पुरस्कार ठाणेकरांसाठी जागतिक स्तरावरील सार्वजनिक उद्यान उभारण्याच्या कल्पनेचा गौरव आहे. आमच्यासाठी हे केवळ उद्यान नसून, ते भावी पिढ्यांसाठी एक हिरवा वारसा आहे, असे ही ते म्हणाले.
थायलंडमधील जागतिक स्तरावर प्रशंसित स्टुडिओ, लँडस्केप आर्किटेक्ट्स ४९ (एल४९) द्वारे डिझाइन केलेले, हे उद्यान आघाडीच्या वास्तुविशारद आणि शहरी विचारवंतांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीने निवडले आहे.
नमो ग्रँड सेंट्रल पार्कची वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टिव्हल (WAF) २०२५ साठीही निवड झाली आहे, आणि येत्या नोव्हेंबरमध्ये मियामी येथे जागतिक स्तरावर त्याचे सादरीकरण होणार आहे.
असे आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्क…
नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे जागतिक दर्जाचे शहरी उद्यान म्हणून डिझाइन करण्यात आले असून, प्ले झोन, स्पोर्ट्स अरेना आणि थीम गार्डन तीन प्रमुख विभागांमध्ये विभागलेले आहे. या उद्यानामध्ये “X” आकाराचा पूल, मोरोक्कन, चायनीज, जपानी व मुघल शैलीने प्रेरित चार थीम गार्डन्स, अनोखी रचना, फिटनेस स्टेशन, चालण्याचे व सायकलिंगचे मार्ग, ध्यान क्षेत्रे, आणि सर्व वयोगटांसाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या हरित जागा आहेत. २५ एकर (१०१,१७१ चौ. मीटर) क्षेत्रफळाचे हे उद्यान दरवर्षी सुमारे ८,८४,००० पाउंड्स ऑक्सिजन निर्माण करून शहराच्या हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करते.
नमो ग्रँड सेंट्रल पार्कमधील सुविधा…
फिटनेस / क्रीडा विभाग – स्केट पार्क, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, फिटनेस स्टेशन, फूटसाल कोर्ट, अॅडव्हेंचर झोन आणि क्लायम्बिंग एरिया
प्ले झोन – झिप लाइन, फिटनेस स्टेशन, साहसी खेळ क्षेत्र ( एडवेंचर प्ले एरिया), भूलभुलैया (Maze), स्प्लॅश पॅड, टॉट लॉट (लहान मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र), ट्री हाऊस, उतारावरची स्लाइड (Embankment Slide), आणि व्हिक्टरी हिल
लेक झोन – प्रतिष्ठित X- ब्रिज, ४०० आसन क्षमतेचे अँफीथिएटर, ७५० मीटर लांब प्रोमेनाड आणि व्ह्यूइंग डेक
विशेष बसण्याची ठिकाणे – कन्वर्जन्स रिंग, फ्लोरा ट्रेलिस, निरीक्षण डेक (Observation Deck), कॅनोपी डेक आणि चार थीम गार्डन्स
खाद्यपदार्थ विभाग – फॅमिली रेस्टॉरंट, कॅफे, स्वच्छतागृहे आणि पाण्याचे कारंजे
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी गोल्फ कार्ट सेवा