शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ठाणे शहरात शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असतानाच त्यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिवसैनिकांना १२ वाजता कोर्टनाका येथील रेस्ट हाऊस जवळ जमण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर शिवसैनिक खारटन रोड येथील आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच शक्तीस्थळावर जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिंदे गटाकडूनही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शिंदे गटाने अभिवादन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर उभारले आहेत.

आजच्या आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष –

आनंद दिघे यांचे २६ ऑगस्ट २००१ मध्ये निधन झाले होते. त्यामुळे दरवर्षी २६ ऑगस्टला त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आजच्या आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ठाणे शहरात शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिवसैनिकांना जमण्याच्या सूचना केल्या –

त्यातच दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिवसैनिकांना आज १२ वाजता रेस्ट हाऊस येथे जमण्याच्या सूचना केल्या आहेत. या ठिकाणी शिवसैनिक जमल्यानंतर ते आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच, शक्तीस्थळावर जाणार आहेत. तर शिंदे गटानेही शहरात बॅनरबाजी करण्यास सुरूवात केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane on the death anniversary of anand dighe shiv sainiks will go to shaktisthala various programs are also organized by the shinde group msr