ठाणे – ठाणे शहरातील विशाल उंबळकर यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यावेळी त्यांनी मास्टर्स चार या खेळ प्रकारात १०५ किलो वजनी गटामध्ये रौप्य आणि कांस्यपदक मिळवले आहे.
केप टाऊन दक्षिण आफ्रिका येथे १० ते १९ ऑक्टोबर या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत त्यांनी अविस्मरणीय अशी कामगिरी करून आपल्या भारताला हा बहुमान मिळवून दिला. ठाण्यातील आनंद नगर येथील एनर्जीया फिटनेस सेंटर मध्ये त्यांनी सराव केला. २०२२ मध्ये (कॉमनवेल्थ )न्यूझीलंड या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेत त्यांनी चार सुवर्णपदके पटकावली होती. त्याचबरोबर यंदा कोझिकोडे( कर्नाटक) येथे झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी २८५ किलो प्रकारात वजन उचलून नॅशनल रेकॉर्ड केलेला आहे.
