टेंभीनाका येथील नवरात्रौत्सवानिमित्ताने ठाणे पोलिसांनी या परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. ५ ऑक्टोबर पर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. या वाहतूक बदलामुळे शहरात कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक बदल पुढील प्रमाणे
१) ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी टॉवर नाका येथे प्रवेश बंद आहे. येथील वाहने गडकरी रंगायतन चौक, दगडीशाळा चौक, अल्मेडा चौक येथून जातील.

२) गडकरी रंगायतन चौक ते टॉवर नाकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूल (गडकरी रंगायतन चौक) येथे बंद करण्यात येत आहे. ही वाहने दगडीशाळा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील

हेही वाचा >>> उल्हासनगर : विनापरवाना फटाक्यांच्या साठ्यावर कारवाई ; तब्बल ४३ लाख २७ हजारांचा साठा बेकायदेशीर, गुन्हा दाखल

३) धोबी आळी चरई ते अटलजी रोड ते भवानी चौक मार्गे टेंभीनाकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना बंदी आहे. ही वाहने धोबी आळी (एम. फेअर अपार्टमेंट) पर्यंत जातील आणि धोबी आळी चौक येथे डावीकडे वळून डॉ. सोनमिया रोड धोबी आळी मशीद मार्गे इच्छित स्थळी जातील.

४) कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. सर्व वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून डावीकडे वळून जांभळी नाका, टॉवर नाका, मूस चौक मार्गे वाहतूक करतील.

५) दगडी शाळा येथून टेंभीनाका, वीर सावरकर रोड मार्गे जाणाऱ्या सर्व वाहनांना दांडेकर ज्वेलर्स (यशोदीप क्लास) येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने दांडेकर ज्वेलर्स, उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग, अहिल्यादेवी उद्यान, धोबी आळी कॉस (मे फेअर अपार्टमेंट) येथून डावीकडे वळण घेतील आणि मशीद येथून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दिशेने जातील.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत लघुलेखकाला सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

६) मीनाताई ठाकरे चौक येथून टेंभीनाका येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना बंदी असेल. ही वाहने जीपीओ, कोर्टनाका, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे वाहतूक करतील.

वाहने उभी करण्यास मनाई
दगडी शाळा, सेंट जॉन बॅप्टिस्ट हायस्कुल, दांडेकर ज्वेलर्स, उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग, अहल्यादेवी उद्यान, धोबी आळी चौक, डॉ. सोनुमिया रोड ते जिल्हा सामान्य रुग्णालय या भागात वाहने उभी करण्यास मनाई असेल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane traffic changes in the city due to navratri procession at tembhinaka amy
First published on: 26-09-2022 at 15:08 IST