ठाणे : राज्यातील काही भागात झिका आजाराचा प्रादूर्भाव वाढू लागला असला तरी ठाणे जिल्ह्यात या आजाराचा अद्याप तरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. गंगाधर परगे यांनी केला आहे. रुग्ण आढळून आलेला नसला तरी नागरिकांनी विशेष करुन गरोदर महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… दीड वर्षांपासून ७८८ सहाय्यक पोलिस निरिक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, निवृत्ती जवळ आल्याने स्वप्न भंगण्याची चिन्हे

हेही वाचा… ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा बैठकांचा सपाटा, प्रत्येक बूथवर मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दिला कार्यक्रम

एडिस डास चावल्यामुळे झिका, डेंग्यू , चिकनगुनिया या आजारांचा प्रादूर्भाव वाढत असतो. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झिका आजाराचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात या आजाराचा प्रादूर्भाव पसरु नये यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे आपल्या परिसरात डासांचा प्रादूर्भाव आहे की नाही याची तपासणी त्यांनी केली पाहिजे. तसेच हलक्या रंगाचे, सैल-फिटिंग कपडे घालावे. शक्यतो लांब बाही आणि हात व पाय झाकण्यासाठी मौजे याचा वापर करावा. पाण्याच्या ठिकाणी डासांचा प्रादूर्भाव मोठ्याप्रमाणात होत असतो. त्यामुळे घराच्या आत किंवा बाहेर पाणी जमा करून ठेवलेले सर्व कंटेनर रिकामे करावे किंवा झाकून ठेवावे. सर्व गर्भवती महिलांनी सक्रिय झिका संसर्ग असलेल्या भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन डाॅ. परगे यांनी केले. वेळोवेळी गावागावात धुर फवारणी केली जात आहे. तसेच घरोघरी सर्वेक्षण देखील सुरु आहे, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Till now no zika virus case in thane district but have to take precautions by all appeal of district health department to citizens asj