पालिकेसमोर मोठा पेच

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : वसई-विरार महापालिकेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झाला असून पालिकेकडे अक्षरश:हजारो हरकतींचा पाऊस पडला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार या अंतिम याद्या बुधवारी प्रसिद्ध होणार होत्या. मात्र निवडणूक प्रक्रिया स्थगित केली असल्याने या याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. मात्र या प्रारूप याद्यांमधील गोंधळ निस्तरणे पालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला होता. त्यानुसार पालिकेने प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्या होता. त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. त्यानंतर या हरकती सूचनांचा विचार करून ३ मार्च रोजी अंतिम याद्या प्रसिध्द केल्या जाणार होत्या. पालिकेच्या नऊ प्रभागात हरकती मागविण्यात आल्या होत्या. या प्रारूप याद्यांमध्ये अनेक गोंधळ असल्याने नागरिकांचा आणि राजकीय पक्षांकडून हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला. सर्वाधिक म्हणजे ७ हजार हरकती या वालीव प्रभागात आल्या आहेत. त्या हरकतींची छाननी करणे, त्या दुरूस्त कऱ्ण्याचे काम प्रभागात उशीरा पर्यंत सुरू होते.

बहुतांश हरकती या प्रभागातील नावे दुसर्म्या प्रभागात गेल्याच्या तसेच नावे गायब झाल्याच्या आहेत.  वाघोली निर्मळ च्या प्रभाग ९४ मधील सुळेश्वर पाडा,निर्मळ, सागरमुख, कळंबरोड, शिवशंकर पाडा,एकविरा मंदिर रोड,रावारपाडा, शांतीवन, मालई तलाव, दोडतीपाडा येथील मतदारांची नावे यंदा ५६ मध्ये गेली आहेत.कित्येक वर्षांंपासून प्रभाग क्र.९ मध्ये असलेली मतदारांची नावे—४,७,१०,११ अशा प्रभागात विभागली गेली आहेत. वसईच्या पुर्वेकडील वालीव गावातील प्रभाग क्र ७६ मधील मतदारांची नावे ७३ आणि ७४ मध्ये गेली असून,७३ मधील नावे ७४ मध्ये गेली आहेत.त्याचप्रमाणे गोखिवरे येथील ९१ मधील नावे ८८ मध्ये तर ८६,८७ मधील मतदारएव्हरशाईन मधील प्रभाग ९१ मध्ये नोंदवले गेले आहेत.नालासोपारातील ३९,४६, ५४,५८,६२,६६,६९,७८,८० या प्रभागातही मतदारांची नावे अदला—बदल झाली आहेत.वसईतील प्रभाग ११४ मधील दिड ते दोन हजार मते ११३ मध्ये गेली आहेत.

एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात टाकणे, नावे गायब करणे असे प्रकार घडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार या याद्यांचा अभ्यास करत आहेत. हक्काचे मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकली जात असल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मतदार याद्यांमध्ये गोंधळ, पालिकेकडे हरकतींचा पाऊस

प्रभाग ९४ मधील सुळेश्?वर पाडा,निर्मळ,सागरमुख,कळंबरोड,शिवशंकर पाडा,एकविरा मंदिर रोड,रावारपाडा,शांतीवन,मालई तलाव,दोडतीपाडा येथील मतदारांची नावे यंदा ५६ मध्ये गेली आहेत.कित्येक वर्षांंपासून प्रभाग क्र.९ मध्ये असलेली मतदारांची नावे—४,७,१०,११ अशा प्रभागात विभागली गेली आहेत. वसईच्या पुर्वेकडील वालीव गावातील प्रभाग क्र ७६ मधील मतदारांची नावे ७३ आणि ७४ मध्ये गेली असून,७३ मधील नावे ७४ मध्ये गेली आहेत.त्याचप्रमाणे गोखिवरे येथील ९१ मधील नावे ८८ मध्ये तर ८६,८७ मधील मतदारएव्हरशाईन मधील प्रभाग ९१ मध्ये नोंदवले गेले आहेत.नालासोपारातील ३९,४६, ५४,५८,६२,६६,६९,७८,८० या प्रभागातही मतदारांची नावे अदला—बदल झाली आहेत.वसईतील प्रभाग ११४ मधील दिड ते दोन हजार मते ११३ मध्ये गेली आहेत.

एका प्रभागातील नावे दुसर्?या प्रभागात टाकणे, नावे गायब करणे असे प्रकार घडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार या याद्यांचा अभ्यास करत आहेत. हक्काचे मतदारांची नावे दुसर्?या प्रभागात टाकली जात असल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निर्देशानुसार प्रक्रिया

दरम्यान, निवडणूक आयोगाने वाढत्या करोनाच्या पाश्र्वभूमीवर निवडणूकीच्या प्रक्रियेला स्थगिती दिल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रारूप याद्यांमध्ये दुरूस्ती कऱ्ण्यासाठी वेळ मिळणार आहे. बुधवारी नियोजित कार्यक्रमानुसार अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. परंतु निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने त्या प्रसिद्ध केल्या नाहीत, असे प्रभारी साहाय्यक आयुक्त (निवडणुक) प्रेमसिंग जाधव यांनी सांगितले. आयोगाच्या निर्देशानुसार पुढील प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले.