ठाणे – समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. वारली चित्रकलेत प्रविण असलेल्या कलाकार शहनाज शेख आणि येऊर येथील आदिवासी समाजातील विद्यार्थी करीना साऊद यांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये नुकतेच हे शिबीर पार पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव

हेही वाचा >>> ठाणे शहरात बुधवारी पाणीपुरवठा नाही

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपायोजना राबविण्यात येतात. याच पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी. तसेच अत्यंत प्राचीन वारली या चित्रप्रकाराची मुलांना माहिती मिळावी या हेतून संस्थेतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील मानपाडा, माजिवडा, कळवा, कोपरी, सावरकर नगर अशा वेगवेगळ्या विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वारली चित्रकलेत प्रविण असलेल्या कलाकार शहनाज शेख आणि येऊर येथील आदिवासी समाजातील विद्यार्थी करीना साऊद यांनी विद्यार्थ्यांना वारली चित्रकलेचे धडे दिले. विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे चित्रकलेचे सर्व साहित्य पुरवण्यात आले. या शिबिरात ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी आदिवासी जीवनाची आणि त्यांच्या विविध वाद्द्यांची, कलेची माहिती मुलांना सांगितली. तर संस्थेचे अध्यक्ष हर्षलता कदम, उपाध्यक्ष सुनील दिवेकर, जेष्ठ कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warli painting training thane students innovative initiative samata vichar prasarak sanstha ysh