कल्याण- कल्याण पूर्व, टिटवाळा, वडवली आणि शहाड भागांचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण विभागाच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुरुस्तीच्या कालावधीत दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणी साठा करुन ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी केले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

हेही वाचा >>> झाडाला ऑइल पेंट लावू नये, भपकेबाजपणा टाळा…शहर सौंदर्यीकरणाबाबत ठाणे आयुक्तांनी केल्या सूचनाth

कल्याण पूर्व, टिटवाळा, शहाड, वडवली भागाला उल्हास नदीवरील मोहिली उदंचन केंद्र आणि बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिक, तांत्रिक दुरुस्ती, देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळी प्रस्तावित भागांचा पाणी पुरवठा सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले.