ठाणे : ठाणेकरांना शहराबद्दल मूळातच असलेला अभिमान आणखी वाढेल या उद्देशाने सौंदर्यीकरण करण्याच्या सुचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सौंदर्यीकरणाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. रोषणाईत भपकेबाजपणा टाळून ती निवडक ठिकाणीच पण आकर्षक पद्धतीने केली जावी, म्हणजे त्याचे वेगळेपण दिसेल. झाडांभोवती सरसकट दिवे न लावता ते झाड, त्यावरील पक्ष्यांच्या वास्तव्याला बाधा येणार नाही. झाडाला ऑइल पेंट लावू नये, तसेच, त्या झाडाच्या वाढीला अटकाव होणार नाही ही पथ्ये कटाक्षाने पाळली जावीत, असेही आदेशही त्यांनी दिले.

हेही वाचा >>> विश्लेषण: रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतं? प्री- डिनरने वजन नियंत्रणात मदत होते का? जाणून घ्या

हेही वाचा >>> डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहर सौंदर्यीकरणाच्या कामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीस, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता विकास ढोले तसेच सौंदर्यीकरण करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होेते. सौंदर्यीकरण म्हणजे केवळ चौक सुशोभीकरण करून ‘सौंदर्यीकरणाची बेटे’ तयार करणे नव्हे. तर, संपुर्ण परिसरात सौंदर्यीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात यावा. त्यात विशेष, लक्ष झोपडपट्टी आणि गावठाण क्षेत्र यावरही असावे, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. ठाणेकरांना शहराबद्दल मूळातच असलेला अभिमान आणखी वाढेल या उद्देशाने सौंदर्यीकरण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सौंदर्यीकरणातून शहराविषयीची आत्मियता तर वाढेलच, पण जबाबदारीची जाणिवही वाढीस लागेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> ठाण्यातील दडपशाहीविरोधात ठाकरे गटाचा इशारा  

रंग आणि चित्र कामांमुळे शहरातील भिंतींना रंगरुप मिळू लागले की सौंदर्यीकरणाला बाधा येईल अशा जाहिराती चिकटवण्याचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होईल. शहरात स्वच्छता राखतानाच, भिंतींवरील रंगकामाचा दर्जा चांगला हवा. ते काम उन, वारा, पाऊस यांच्यामुळे खराब होऊ नये. किमान वर्षभर ते व्यवस्थित राहिले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. स्थानिक कलाकार, जे जे कला महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्थानिक कला महाविद्यालयाचे विद्यार्थी अशा दोन हजार जणांचा चमू बनवून प्रभाग समितीनिहाय पुढील १५ दिवसात काम सुरू झाले पाहिजे आणि तीन महिन्यात काम पूर्ण झाले पाहिजे. शहरातील प्रमुख रस्त्यांपासून सुरूवात करून त्यानंतर छोट्या रस्त्यांची कामे करावीत, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. सौंदर्यीकरणाची कामे कालबद्ध पध्दतीने होतील. या कामासाठी हिवाळ्यातील हवामान पोषक असते.

सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण करण्यासाठी १५ जानेवारी, २०२३ चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

अभिजीत बांगर आयुक्त, ठाणे महापालिका.