लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आवडत्या गाण्यांवर नाचायला आवडते. सोशल मीडियावर असे एकापेक्षा एक व्हिडिओ रोज पाहायला मिळतात ज्या लोक बिनधास्तपणे नाचत असतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना कधी कधी लोकांना प्रचंड आवडतात. अलीकडेच अशाच एक व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. व्हिडीओमध्ये एक प्रोफेसर प्रभुदेवाच्या ‘मुकाबला-मुकाबला’ या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्हीच बघा.

बंगळुरूच्या एका प्रोफेसरने नेटकऱ्यांना थक्क केले आहे. त्याचा अफलातून हिप-हॉप डान्स त्यांते विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत. या इंजिनिअरिंग प्रोफेसरने भन्नाट डान्स केला आहे. प्रभु देवाच्या मुकाबला या गाण्यावर तो नाचतानाचा त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रभु देवा सरांना देखील आवडेल सरांचा डान्स” अनेक वापरकर्त्यांनी त्यांना “मेकॅनिकल जॅक्सन” (Mechanical Jackson) असे नाव दिले आहे.

या परफॉर्मन्सचा व्हिडिओ दोन भागात शेअर करण्यात आला होता ज्यामध्ये प्रोफेसर स्टेजवर नाचत आहे आणि विद्यार्थ्या टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवत आहेत.

व्हायरल व्हिडिओ बघा

नेटकरी काय म्हणाले

व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट करून त्या प्रोफेसरचे कौतुक केले आहे. एकाने म्हटले की, तो मायकल जॅक्सन आहे. तर दुसरा म्हणाला की, “तो सर्व कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा आवडते प्रोफेसर आहे”

तिसऱ्याने लिहिले की, “हाडाचा डान्सर जो एक प्रोफेसर झाला आहे.”

प्रोफेसरचा व्हिडिओ चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या महिन्यातच, कॉलेजच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात मायकल जॅक्सनच्या आयकॉनिक डान्स स्टेप्स पुन्हा तयार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला.