“बालपण देगा देवा” असे म्हणतात ते उगाच नाही. बालपणीचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आठवणीचा काळ असतो. बालपणी कशाचीही चिंता नाही, फक्त मनसोक्त खेळणे, बागडणे आणि मज्जा मस्ती करणे. बालपणी कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण किती उत्सुक असायचो. प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगत असते. आता रोजच्या धावपळीत तो काळ केव्हाच मागे पडला. पण अजूनही लहान मुलांना बालपण जगताना पाहिलं अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणी आठवतात अन् चेहऱ्यावर हसू येते. लहान मुलं ही अत्यंत निरागस असतात ते कोणत्याही गोष्टीचा मनापासून आनंद घेतात मग ते एखादा नवीन खेळ असो, नवीन गाणे असो किंवा डान्स. कोणतेही गोष्ट ते मनापासून करतात म्हणूनच कदाचित ते त्याचा आनंद घेऊ शकतात. सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्सचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून प्रत्येकाला पुन्हा लहान व्हावे, पुन्हा बालपण जगावे असे वाटते. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जी आपल्याच धुंदीत नाचत आहे. तिला काही उत्तम डान्स येत नाही पण जमेल तसा ती प्रयत्न करते आहे आणि आनंदाने नाचत आहे. कोण काय म्हणले याची तिला अजिबात पर्वा नाही. याच निरागसपणामुळे तिचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी एखादे गाणे व्हायरल होते तर कधी एखाद्या गाण्यावरील डान्स व्हायरल होतो. सध्या अशाच एका गाण्याची जोरदार चर्चा होत आहे ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड या मराठमोळ्या गायकाचे ‘एक नंबर, तुझी कंबर’ हे नवीन गाणं सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. याच गाण्यावर अनेकजण डान्स करताना दिसत आहे. एक चिमुकली देखील या गाण्यावर नाचत आहे जे पाहून नेटकऱ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले आहे.

व्हिडीओमध्ये साधारण २-३ वर्षाची एक चिमुकली दिसत आहे. चिमुकलीला गाण्याचे बोलता देखील येत नाही असे दिसते पण तरीही ती या गाण्यावर डान्स करत आहे. बहुदा व्हिडिओ बघून ती डान्स स्टेप हुबेहुब कॉपी करत आहे. तिचे हावभाव इतके गोंडस आहेत की सर्वांचे मन जिंकत आहे. व्हिडीओवर tomader.mehu नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. शेकी बेबी शेकी असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी चिमुकलीचे कौतुक केले.

एकाने कमेंट केली की, “शेकी शेकी ट्रेंडची विजेती”

दुसऱ्याने लिहिले की, “अरे बापरे! एवढी छोटी गोंडस बाळ आहे अन् सुंदर डान्स केला आहे, व्वा अप्रतिम”

tomader.mehu चा गोंडस डान्स व्हिडिओ व्हायरल होण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी तिने अशाच प्रकारे द्धा कपूरलाच्या ‘आई नहीं’ गाण्यावर गोंडस डान्स केला आहे.

शेकी शेकी गाणे कोणी गायले

Shaky’ हे गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्यात संजूच्या सोबतीला ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. बालकलाकार साईराज केंद्रे आणि वेदांती यांनी देखील या गाण्यावर अफालातून डान्स केला आहे.