Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सापाचे खेळ दाखवणाऱ्या गारूडीला साप चावताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओ पुढे जीव वाचवण्यासाठी हा गारुडी काय करतो, हे पाहून तुम्हाला धक्का बसेन. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

गारुडी हा सापाचे खेळ दाखवणारा एक अद्भूत कलाकार आहे. अंगा खांद्यावर साप घेऊन तो लोकांचे मनोरंजन करतो पण अनेकदा सापाचा खेळ त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कशाप्रकारे गळ्यात साप घेऊन उभ्या असलेल्या गारुडीला साप कसा चावतो.

हेही वाचा : धक्कादायक! प्रवाशांनी चक्क रेल्वेच्या शौचालयात उभं राहून केला प्रवास, रेल्वेतील भयंकर गर्दीचा VIDEO होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गारुडी दिसेल. त्याच्या खांद्यावर तुम्हाला कोब्रा साप दिसेन. अचानक हा साप या गारुडीच्या हाताला चावतो. हे पाहून गारुडी सापाला हातात घेतो आणि सापाचे तोंड पकडून त्याचे दात बाहेर काढतो. गारुडीची धडपड पाहून तेथील स्थानिक लोकं त्याच्या मदतीला धावतात. एक व्यक्ती दोरी घेऊन येतो आणि ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणी ही दोरी बांधतो जेणेकरून सापाचे विष शरीरात पसरू नये तरी सापाचे विष पसरू नये, याची गारुडीला भीती वाटते त्यामुळे भीतीपोटी तो ब्लेडनी हातावर वार करतो. ज्यामुळे त्याच्या हातावर रक्तस्त्राव होताना दिसते. रक्तातून विष बाहेर पडावे, यासाठी तो असे करतो.

al_raaaaahi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. या व्हिडीओवर युजर्सनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी गारुडीविषयी दया व्यक्त केली आहे तर काही लोकांनी असे धोकादायक स्टंट करण्यावरून टिका केली आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा गारुडी जीवंत आहे का?” तर एका युजरने लिहिलेय, “असे ब्लेडनी वार करण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे..”