लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांच्या हातात एखादी गोष्ट लागली, तर ते त्याचा कसा वापर करतील याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत घडला. ही महिला घरातील इतर कामात गुंतलेली असताना तिच्या मुलाच्या हातात तिचा फोन लागला. यानंतर त्याने असे काही केले की ज्यावर हसावे की रडावे हेच आपल्याला कळणार नाही. या मुलाने तिच्या फोनवरून खूप सारे बर्गर्सच मागवले नाहीत, तर आपल्याला मनाला वाटेल इतकी टीपही दिली. हे बर्गर्स घरी पोहचल्यावर या महिलेला या प्रकरणाविषयी समजले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केल्सी गोल्डन नावाच्या महिलेने KHOU11 सोबत बोलताना सांगितले की तिच्या २ वर्षाच्या लहानश्या मुलाने फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून जेवण ऑर्डर केले. जेव्हा याची डिलिव्हरी यायला सुरु झाली तेव्हा या महिला संपूर्ण प्रकार समजला. ती तिच्या कामात व्यस्त होती आणि २ वर्षाचा आपला मुलगा जेवण ऑर्डर करू शकतो याची तिला अजिबात कल्पना नव्हती.

मालकाची गादी चोरण्याचा लहानग्या हत्तीचा गोंडस प्रयत्न कॅमेरामध्ये कैद; हा Viral Video जिंकेल तुमचेही मन

टेक्सासमधील किंग्सविले येथे राहणाऱ्या केल्सीने तिच्यासोबतची ही घटना फेसबुकवर शेअर केली आहे. तिने सांगितले की त्याचा २ वर्षांचा मुलगा बॅरेट त्याच्या फोनवरून बर्गर कसा ऑर्डर करू शकतो. केल्सीने तिच्या पोस्टसोबत, खूप साऱ्या चीजबर्गरसह बॅरेटचा फोटो देखील पोस्ट केला आणि लिहिले की, कोणाला हवे असल्यास तिच्याकडे ३१ फ्री मॅकडोनाल्ड बर्गर आहेत. खरंतर तिच्या २ वर्षाच्या मुलाला वाटत होतं की तो फोनवरून फोटो क्लिक करतोय. दरम्यान, त्यांच्या फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून ३१ चीजबर्गर मागवण्यात आले. या ऑर्डरचे एकूण बिल ६१.५८ डॉलर म्हणजेच सुमारे ५ हजार रुपये होते, ज्यावर मुलाने १२०० रुपयांची टीप देखील जोडली होती.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

याआधी अयांश कुमार नावाच्या २ वर्षाच्या मुलानेही आपल्या आईच्या फोनवरून अशीच कामगिरी केला होता. न्यू जर्सीमध्ये राहणार्‍या भारतीय जोडप्याने सांगितले की कशाप्रकारे त्यांच्या २ वर्षाच्या मुलाने आईच्या फोनवरून सुमारे दीड लाख रुपयांचे फर्निचर ऑर्डर केले. त्यांच्या घरात फर्निचरची डिलिव्हरी सुरू झाल्यावर हा प्रकार त्यांच्या आईला कळला.

एवढेच नाही तर चीनमधील एका २ वर्षाच्या मुलीने तिच्या वडिलांच्या फोनवरून १०० वाट्या नूडल्सची ऑर्डर दिली होती आणि जेव्हा ऑर्डर येऊ लागल्या तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A two year old boy ordered 31 cheese burgers he also gave a tip of rs 1200 even the mother who was at home did not know pvp
First published on: 18-05-2022 at 14:37 IST