Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोझचे सेल्फी अपलोड करण्याची क्रेझ कधीकधी जीवघेणी ठरतेय. : सेल्फी काढायला कुठलंही कारण लागत नाही…जेव्हा मनाला वाटेल हव्या त्या ठिकाणी.. जो तो आपल्याला सेल्फी काढताना दिसतो. पण या सेल्फीमुळे अनेकदा लोकांच्या अंगलट आल्याचा प्रकारही समोर आला आहे.गेल्या काही काळात सेल्फी काढण्याचं क्रेझं कमालिचं वाढलं आहे. मोबाईल कॅमेरा अद्ययावत झाल्यामुळे त्यात विविध प्रकारचे फिचर्स देखील वाढत चालले आहेत. परिणामी सेल्फी वेड्यांना आणखीच चेव फुटत चाललाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु दिसेल तिथे सेल्फी काढणाची सवय कधीतरी अंगाशी देखील येऊ शकते. याचिच प्रचिती देणारा एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने कारच्या विंडोमधून सेल्फी घेण्याच्या नादात स्वत:चा फोनच गमावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणीला सेल्फीची हौस चांगलीत महागात पडल्याचं दिसत आहे. फोटो काढण्याच्या नादात तिचा मोबाईलच कारमधून खाली पडतो आणि ती फक्त बघत राहते कारण कार इतक्या भरधाव वेगात असते की तिलाही कळत नाही की मोबाईल नक्की गेला कुठे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी कारमध्ये मागच्या सीटवर निवांत बसली आहे. यावेळी तिला बाहेरचं वातावरण पाहून सेल्फी घेण्याचा मोह झाला. यावेळी ती कारच्या विंडोमधून बाहेर येत मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असते. पुढे काही होणार आहे याची तिला बिलकुल कल्पना नसताना अचानक तिच्या हातातील मोबाईल हवेने अक्षरश: उडून जातो. कार वेगात असल्याने हवेचा वेगही जास्त होता. त्यामुळे वेगाने मोबाईल मागे उडून जातो. यानंतर तरुणीलाही नक्की क्षणात काय झालं हे कळतं नाही मात्र पुढच्याच क्षणी आपला मोबाईल पडल्याचं तिच्या लक्षात येत आणि ती ओरडू लागते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: गृहिणीनं ऑनलाईन मागवलं ५ किलो पनीर; कापताच आत निघाली धक्कादायक गोष्ट

हा व्हिडिओ एक्सवर @nehansunny नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी या तरुणीची खिल्ली उडवली आहे. शिवाय आता तरी सेल्फीच्या सवयीवर आवर घाला असा सल्ला देखील काही जणांनी तिला दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman is taking a selfie as she starts taking a selfie her phone falls out video goes viral on social media srk