Shocking video: आजकाल ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्वयंपाक घरातील किराणा ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तू ऑनलाईन विकत घेता येतात. अनेक जण आता ऑनलाइन खरेदीलाच प्राधान्य देतात. परंतु, ज्या प्रकारे घोटाळे वाढत आहेत, त्या हिशोबाने लोक ऑनलाइन खरेदी करणे बंद तर करणार नाही असाही प्रश्न आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या घोटाळ्यामुळे अनेकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. काहीवेळी आपण ऑर्डर एक करतो आणि येते दुसरीच वस्तू. रिकामा बॉक्सच्या ऑर्डर आलेलीही अनेक प्रकरण आपण एकली असतील. मात्र सध्या समोर आलेलं प्रकरण जरा विचित्र आहे, कारण याप्रकरणामध्ये मागवलेलं पनीर मात्र घरी काय आलं हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल…याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका महिलेनं ऑनलाईन ५ किलो पनीर मागवलं होतं. मात्र तिनं पनीर कापताच आत जे दिसलं ते धक्कादायक होतं.

cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टी अगदी सहजसोप्या झाल्या आहेत. मोबाईलच्या एका बटणावर कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळू लागलीय. बँकेची कामं असू देत की ऑनलाईन शॉपिंग असू देत सोशल मीडियावर अनेक अॅप उपलब्ध आहेत. इतकंच काय तर आपल्याला खावेसे वाटणारे चमचमीत पदार्थही आपण घरबसल्या मागवू शकतो. मात्र एका महिलेला याचा विचित्र अनुभव आलाय.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही ऑनलाईन काहीही पदार्थ मागवताना शंभर वेळा विचार कराल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गृहिणीने नेहमीप्रमाणे जेवणासाठी पनीर मागवलं. यावेळी पनीर कापताना ते कठीण असल्याचं सुरुवातीला तिला जाणवलं मात्र ते कठीण झालं नव्हतं तर पनीरच्या आतमध्ये भलामोठा दगड निघाला. हे पाहून महिलेला मोठा धक्काच बसला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिथे संघर्ष तिथे विजय! वडील शेतात असताना लेकाचा रिझल्ट लागला; एकमेकांना मिठी मारुन रडू लागले बाप-लेक

याआधीही असे अनेक प्रकार समोर आले आहेत. हा व्हिडीओ satpalaman2 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले आहेत.