लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. वर्षानु वर्षे ही कला जोपासली जात आहे. सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक लावणीचे व्हिडिओ पोस्ट केले जातात पण मोजकेच व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका चिमुकल्याच्या लावणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान आता एका तरुणाचा लावणी सादर करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. लावणी ही काही महिला कलाकारांपुरती मर्यादीत नाही. पुरुष देखील अप्रतिम लावणी सादर करू शकतात हे सिद्ध करणारा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडिओमध्ये, “तुझ्या उसाला लागल कोल्हा’ या गाण्यावर लावणी ठसकेबाज सादर केली आहे. विशेष म्हणजे तरुणाने नऊवारी नेसून ही लावणी सादर केली आहे. नऊवारी नेसल्यानंतरही तो अगदी सहजपणे नाचताना दिसत आहे. ढोलकीच्या तालावर त्याने अचूक ठेका ठरला आहे. गाण्याच्या बोल ऐकून त्याला साजेसे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. या तरुण लावणी कलावंताने अनेक तरुणींना मागे टाकले आहे. तरुणाची लावणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर lonewolf_251 आणि vihanggurav या खात्यावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” लावणीचे सादरीकरण उत्कृष्ट होते @vihanggurav चा अभिनय हा लय, आवड आणि अभिजाततेचा परिपूर्ण मिश्रण होता !!!! नादच नाही भाऊचा!

नेटकऱ्यांना प्रचंड आवडली तरुणाची लावणी

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तरुणाचे तोंडभरून कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली की, “अप्रतिम. बिल्डिंगमध्ये किट्टू (विहांगला ) सराव करताना बघण्यापासून , गाणं ऐकताना त्याचा डान्स डोळ्यासमोर येण्यापर्यंत, नशीब लागतं इतक्या सुंदर कलाकाराला घडताना बघताना. मी नशीबवान आहे. भावाला सलाम!”

दुसऱ्याने कमेंट केली की,”धुमकिटमकिट धुमकिट तदानी धुमकिट,
नटनागर नट हिमनट पर्वत उभा,
उत्तुंग नभा घुमतो मृदुंग,
पखवाज देत आवाज झनन झंकार!
लेउनी स्त्रीरूप भुलवी नटरंग…नटरंग…नटरंग!
देव तुला आशीर्वाद देवो भाऊ, तू खूप छान कलाकृती सादर केली आहेस”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man impressive lavani performance on the song tuzya usala lagal kolha watch the viral video netizens love it snk