Pune Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पुणे हे देशातील एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तु, खाद्यसंस्कृतीला एक आगळी वेगळी ओळख आहे. दरवर्षा हजारो विद्यार्थी आणि तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात येतात आणि कायमचे पुणेरी होऊन जातात. पुण्यावर मनापासून प्रेम करणारे लोक पुण्याचा गोडवा गायला विसरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने तो पुणे का सोडू शकत नाही, याची खूप सुंदर कारणे सांगितली आहेत. हा व्हिडीओ लोकांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण आणि एक तरुणी दिसेल. व्हिडीओच्या सुरुवातीला तरुण म्हणतो, “पुणे तर नाही सोडू शकत” त्यावर तरुणी म्हणते, “नुसते पुणे पुणे करत असतो, काय आहे तुमच्या पुण्यात?” त्यावर तरुण या तरुणीला पुण्यात काय काय आहे, हे सविस्तर सांगताना दिसतो. तरुण म्हणतो, “काय आहे आमच्या पुण्यात? अरे शनिवारवाडा पुण्यात, आयटीपार्क पुण्यात, भारतातील पहिली मुलींची शाळाही पुण्यात अन् बाप्पाची स्थापना ही पुण्यात, खडकवासला पुण्यात, सिंहगड पुण्यात, लखलखीत तुळशीबागही पु्ण्यात, जगात भारी बाकरवडीही पुण्यात, शुद्ध आणि स्वच्छ भाषाही पुण्यात, स्कार्प घालून फिरणाऱ्या मुली या पुण्यात, शिक्षणाचे माहेरघर आहे ग पुणे.. मी नाही सोडू शकत ग पुणे..” व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पुणेरी लोकांना किंवा पुण्यावर मनाापासून प्रेम करणाऱ्या लोकांना हा व्हिडीओ आवडू शकतो.

हेही वाचा : VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात

पाहा व्हिडीओ

beyondthefunnandiloovepun या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”अजुन काय आहे, कमेंट करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “आम्ही पुणेरी” तर एका युजरने लिहिलेय, “ट्रफिक घर पण पुण्यात” आणखी एका युजरने लिहिलेय, “जुना रॅप आठवला, पुण्याने जगायला काय दिलं बे”