Petrol jugad video: सोशल मीडियावर रोज नवनवीन जुगाड व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकत नाही. कधी कोणी कारला हेलिकॉप्टर तयार करीत आहे. तर कोणी जुगाड करुन इलेक्ट्रीक स्कुटी तयार करीत आहे. सध्या एक नवीन जुगाड व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने एकदम भारी असा जुगाड केला आहे. कारचे पेट्रोल संपले की, लोक दुसऱ्या बाईकमधून पेट्रोल काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. मात्र या व्यक्तीने केलेला जुगाड पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

एका गाडीतून सहज पेट्रोल काढून दुसऱ्या गाडीत या व्यक्तीने कशाप्रकारे टाकले आहे हे तुम्ही पाहू शकता. व्यक्ती अतिशय काळजीपूर्वक रिकामी तंबाखूची पाकिटे उघडते, त्यात पेट्रोल भरते आणि जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनात टाकते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीचा हा जुगाड लोकांना अधिक आवडला आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Emotional Slogan Written Behind Indian Trucks Video Goes Viral
“जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते ना…” ट्रकच्या मागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुणे-सोलापूर महामार्गावरील VIDEO प्रचंड व्हायरल
Deshi Jugaad Video
VIDEO: याला म्हणतात जुगाड! माठातील पाणी पिण्याची ‘अशी’ सोय पाहून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा Video पाहाच

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे…हा जुगाड राजस्थानच्या बाहेर जाऊ नये. यावर आता लोक प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटी असणाऱ्या स्पर्धकानं कसा जिंकला डाव? VIDEO एकदा पाहाच

@SonuMdevi नावाच्या एक्स खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत ३ लाख ७६ हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर व्हिडिओला १ हजाराहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. लोक जुगाड करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करीत आहे. त्याचबरोबर काही लोकांनी हा जुगाड पाहून डोक्याला हात लावला आहे. लोकांनी या जुगाडबाबत चांगली आणि वाईट अशी दोन्ही मतं मांडली आहेत. यावर युजर्स आपापल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. अप्रतिम व्यवस्था आहे. दुसऱ्या युजरने लिहिले…मला तानसेनचा जुगाड समजला. या जुगाडबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून सांगा.