प्रत्येक ऑफिसमध्ये काही नियम असतात. ज्याचे पालन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करावे लागते. प्रत्येक ऑफिसमध्ये वेगवेगळे नियम असतात. परंतु प्रत्येक ऑफिसमध्ये काम करताना झोपायचं नाही, हा नियम सारखाच असतो. कारण काम करताना कर्मचारी झोपल्याचं कोणत्याही बॉसला आवडत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये झोपायचे नाही हा सगळ्या ऑफिसमधील अलिखित नियम असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परंतु, अनेकदा असे होती की, जागरणामुळे किंवा प्रवास करुन थकल्यामुळे ऑफिसमध्ये काम करत असताना खूप झोप येते. अशा वेळी कितीती झोपायचं नाही ठरवलं तरीही आपले डोळे आपोआप झाकले जातात. पण ऑफिसमध्ये झोपणं म्हणजे नोकरी धोक्यात घालणं ठरु शकतं. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला अशी एक आयडीया मिळेल, ज्यामुळे जर कधी तुमच्या बॉसने तुम्हाला ऑफिसमध्ये झोपलेलं पाहिलं, तरीही तो तुमच्यावर ओरडू शकणार नाही, किंवा तुमची नोकरीही धोक्यात येणार नाही. तर ही आयडीया नेमकी काय आहे पाहूया.

हेही पाहा- थंडीपासून बचाव करण्यासाठी पठ्ठ्याचा विचित्र जुगाड, व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्हाला उपयोगी पडू शकतो. व्हिडिओमध्ये, ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याला झोप अनावर झाल्यामुळे तो झोपल्याचं दिसत आहे. यावेळी तिथे त्याचा बॉस येतो आणि त्याला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळी झोपलेला कर्मचारी हुशारीने डोळे मिटलेले ठेवूनच बॉसला हाताने थांबण्याचा इशारा करतो आणि काही वेळाने तो हात जोडून नमस्कार करुन डोळे उघडतो. डोळे उघडताच बॉसला तो काय काम आहे का? असं इशाऱ्याने विचारतो, यावेळी बॉस काही नाही म्हणतो आणि निघून जातो. कारण त्याला खरंच त्याने प्रार्थनेसाठी डोळे मिटले होते असं वाटतं. व्हिडिओमध्ये कॅप्शन लिहिले आहे, “जेव्हा बॉस तुम्हाला झोपेत पकडतो पण तुमच्याकडे प्लॅन बी असतो.”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

कर्मचाऱ्याच्या हा भन्नाट व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या एक्स (पूर्वीचे Twitter) वर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर त्यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, “चांगली आयडीया आहे, नक्कीच अमलात आणू” तर दुसर्‍याने मजेशीर प्रतिक्रिया देत लिहिलं “झोपेत कोणी कोणी घोरले तर?” तर अनेकांनी या कर्मचाऱ्याची आयडीया पाहून त्याला सलाम केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An employees amazing trick to sleep in the office you will laugh while watching the funny video jap