Dangerous Shark Attack On Divers Video : शार्क हा समुद्रातील सर्वांत धोकादायक, हिंस्त्रक मानला जातो. त्याच्या एका हल्ल्यात कोणत्याही प्राण्याचा, माणसाचा क्षणात मृत्यू होऊ शकतो. तो कोणत्याही प्राण्याला अतिशय क्रूरपणे फाडून खाऊ शकतो. शार्कच्या तावडीत एकदा का शिकार अडकली, तर त्या शिकारीचं जगणं फार अवघड असतं. सध्या अशा एका शार्कच्या टोळीचा भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ही टोळी समुद्रात पोहणाऱ्या पर्यटकांना घेरते आणि पुढे असे काही करते की, पाहून तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सात ते आठ शार्कनी एकाच वेळी समुद्रात पोहणाऱ्या तीन पर्यटकांना घेरले, चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली. त्यामुळे त्यांना सुटका करून घेणं कठीण झालं. अशात एकाच्या हातावर शार्कने जोरदार हल्ला केला. हॉलीवूडच्या फ्लोरिडा समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली.

@ABCNews ने इन्स्टाग्रामवर या घटनेचा एका व्हिडीओ पोस्ट केला, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तीन पर्यटकांना ८ ते १० शार्कनी एकाच वेळी घेरलं आहे. यादरम्यान, शार्क एका पर्यटकावर हल्ला करतो आणि त्याच्या हाताला गंभीररीत्या चावतो. यावेळी सुदैवाने दुसऱ्या पर्यटकाने वेळीच शार्कला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्या पर्यटकाचा जीव वाचला; अन्यथा शार्कने त्याला गिळण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान, दुसऱ्या पर्यटकाने ढकलताच शार्क लगेच तिथून पळून गेला; पण या भयानक हल्ल्यात पर्यटक गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आता समुद्रकिनारी जाणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.