सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर जेव्हापासून रील फीचर लाँच करण्यात आले, तेव्हापासून अनेक जण याचा उपयोग त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी करू लागले आहेत. काही जण या रील फीचरचा उपयोग करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले; तर काही जण याचा अगदीच चुकीचा उपयोग करून ट्रोल होताना दिसले. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने सार्वजनिक परिसरात रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आवाहन थेट सरकारला पोस्टद्वारे केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@Rajput_Ramesh यांच्या एक्स (ट्विटर) पोस्टवर चार व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये रेल्वेस्थानकावर काही तरुण मंडळी डान्स करताना दिसत आहेत. त्यातील काही व्हिडीओ रेल्वेस्थानक, ट्रेनमध्ये शूट करण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकावर आणि ट्रेनच्या आतमध्ये ही तरुणी मंडळी बाकीच्या प्रवाशांची पर्वा न करता, अगदीच विचित्र पद्धतीने व्हिडीओ शूट करताना दिसून आले आहेत. एका व्यक्तीने शेअर केलेली ही पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…रिल बनवताना मुलींसमोर नाचणाऱ्याला पोलिसांनी उठबशा काढायला लावून नाचवला

व्हिडीओ नक्की बघा :

तर त्या व्यक्तीने व्हिडीओ शेअर करीत लिहीले की, प्रिय! @arjunrammeghwal सर, हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत आहे. हा ‘प्राणघातक विषाणू’ आपल्या देशाच्या सर्व भागांत पसरण्यापूर्वी कृपया काही कठोर कायदा आणावा. सर, तुम्ही याबाबत दखल घेऊन, योग्य ती कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद! अशी पोस्ट लिहिण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या वकिलांना पोस्टमध्ये टॅग करण्यात आले आहे. तसेच ही पोस्ट पाहून वकिलांनीही रिप्लाय केला आहे आणि लिहिलेय की, यांच्यासाठी अँटी छपरी २०२४ असा कायदा आणू शकतो का? (Can there actually be a Anti Chapri Act 2024?). याची अत्यंत गरज आहे, असा रिप्लाय पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीने दिला आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @Rajput_Ramesh यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट रिपोस्ट करून अनेक युजर विविध प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti chhapri act 2024 netizens demand action against those making reels in public places asp