Viral video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे कधी कधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटातूट होते. असाच एक आई आणि मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०१७ मध्ये, केवळ १६ वर्षांचा असताना तो घराबाहेर पडला, वर्षानुवर्षे पालकांच्या डोळ्यांत आशेचा दिवा मंदावला…आई–वडील मनोमन मान्य करू लागले की त्यांचा मुलगा कदाचित या जगात नाही…पण बीड पोलिसांच्या अथक शोधमोहीमेने अखेर चमत्कार घडवला. आज रक्षाबंधनदिवशी ८ वर्षांनंतर तो हरवलेला मुलगा आपल्या आई–वडिलांच्या मिठीत परत आला.यावेळी पोलिसांनाही अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बीड पोलिस स्टेशनमध्ये आई वडिल आणि एक तरुण बसलेला दिसत आहे. यावेळी पोलीस ८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या मुलाला घेऊन येतात आणि महिलेला विचारतात की हाच तुमचा मुलगा आहे का? यावर त्याची आई त्याला बघते मुलगा जवळ येतो आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येतं. आई-आणि मुलाची रक्षाबंधनदिवशी झालेली भेट पाहून पोलीसही रडू लागले.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ vijaykumar_rathod.771 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.