Viral Video : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हल्ली गावोगावी आणि शहरोशहरी कचरा गाडी फिरते. आपल्या घरातील कचरा आपण त्यात टाकतो पण रस्त्यावरी कचरा स्वच्छ करण्यासाठी सरकारकडून काही सफाई कामगार नेमलेले आहेत आणि हे लोक कचरा उलचतात. याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत सुद्धा वेगवेगळे मार्ग शोधून कचरा स्वच्छ करताना दिसतात पण सध्या सोशल मीडियावर एक अनोखा जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या जुगाडच्या मदतीने सरकारचे काम आणखी कमी होऊ शकते.व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे चारचाकी गाडीच्या मदतीने रस्ता स्वच्छ केला जात आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल. हा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे, या व्हिडीओमध्ये एक अनोखी चारचाकी गाडी रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. या चारचाकी गाडीच्या मागे एक अनोखे यंत्र लावले दिसत आहे. या यंत्रावर चार झाडू गोल फिरताना दिसत आहे. गाडी जशी जशी पुढे जाते तसे हे चार झाडू गोल फिरत असतात आणि या झाडूच्या मदतीने रस्त्यावरचा कचरा आपोआप स्वच्छ होतो. रस्त्यावरचा स्वच्छ करण्यासाठी ही गाडी खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही आजवर अशी गाडी बघितली नसेल. हा व्हिडीओ कुठला आहे, याविषयी अद्यापही माहिती मिळालेली नाही. पण हा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सोशल मीडियावर अनेक जुगाड व्हायरल होत असतात पण त्यापैकी एक सर्वात चांगला जुगाड म्हणता येईल. जर सरकारने या जुगाडचा वापर केला तर त्यांचे काम आणखी कमी होऊ शकते.
हेही वाचा : Mumbai : चाळीतल्या जीवनाची मज्जाच वेगळी! चाळीतले लोक कसे जीवन जगतात? पाहा व्हायरल व्हिडीओ
Sunaina Bhola या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्वत:ला नाविन्यपूर्ण बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनेची वाट कशाला बघावी? भारतात याला जुगाड म्हणतात. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा भन्नाट जुगाड आवडला आहे. एका युजरने लिहिलेय,” “खूप छान”