Viral video: प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य, आणि सुंदर प्रवास असतो. आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातले भाव सांगणे ही वाटती तितकी सोपी गोष्ट नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी जितके धाडस लागते, तितकेच ते व्यक्त करण्यासाठी कलाही असावी लागते. कारण प्रपोज हा असा क्षण असतो, जो तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल भाव निर्माण करतो. सध्या अशाच एका हटके सरप्राईजची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. असं म्हणतात जर प्रयत्न दोन्ही बाजूने असेल तर ते नातं आयुष्यभर टिकत. एका तरुणानं आपल्या अंध प्रेयसीला अनोख्या पद्धतीने प्रपोज केलंय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलं ही आपल्या आवडत्या मुलीचा होकार मिळवण्यासाठी प्रपोजच्या हटके आयडीया ट्राय करत असतात. अशीच एक आयडीया या तरुणानं वापरली आणि आपल्या अंध गर्लफ्रेंडला हटके स्टाईलमध्ये प्रपोज केलं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गर्लफ्रेंडला दिसत नसल्यामुळे तरुणानं तिला अनोख प्रपोज केलं आहे. यावेळी बॉयफ्रेंड त्याच्या अंध गर्लफ्रेंडला डिनर डेटवर घेऊन गेला. तिथे त्यानं तिला ब्रेल लिपीचा वापर करत प्रपोज केला आहे. एका प्लेटमध्ये त्यानं ब्रेल लिपीची अक्षरं अशा पद्धतीने ठेवले की त्याच्या स्पर्शाने गर्लफ्रेंडला कळलं की त्यानं आपल्याला प्रपोज केलं आहे. त्यानं तिच्या प्लेटमध्ये लिहलं होतं की, माझ्याशी लग्न करशील का. अंध व्यक्तींना दिसत नसल्यामुळे ते सगळ्या गोष्टी स्पर्शाने आणि वासाने ओळखतात. यामुळे या तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला अशा पद्धतीत प्रपोज केलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गर्लफ्रेंड खूप खूश झाली आहे. त्यानंतर तरुणानं तिच्यासाठी अंगठीसुद्धा आणलेली होती, ती अंगठीही त्यानं तिच्या हातात घातली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच

या १६ सेकंदाच्या व्हिडिओने ६.१ दशलक्षाहून अधिक व्ह्यूजसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि प्रत्येक मिनिटाला व्ह्यूज आणि लाईक्सची संख्या वाढत आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “प्रेमात रंग रुप असं काही नसतं.” तर आणखी एकानं “याला म्हणतात खरं प्रेम” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video goes viral on social media srk