Wedding viral video: लग्न म्हटलं की नाच-गाणी, मस्ती आणि धमाल यांचा वातावरण तर असतोच, पण अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका लग्नाच्या व्हिडीओने तर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. साधारणपणे लग्नात मुली, मैत्रिणी आणि नातेवाईक जबरदस्त डान्स करून लग्नाची रंगत वाढवतात. मात्र, या व्हिडीओत मुलांनीच असा परफॉर्मन्स दिला की पाहणारे थक्क झाले. मित्रांच्या या भन्नाट आयडियाने संपूर्ण लग्नाची रंगतच वाढली.

व्हिडीओ एका मित्राच्या लग्नातील आहे. यात काही मुलांनी ‘घूंघट की आड़ से’ या जुन्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यावर साधारणपणे लग्नात मुली, मैत्रिणी आणि नातेवाईक जबरदस्त डान्स करून लग्नाची रंगत वाढवतात.. त्यांचा डान्स, एक्स्प्रेशन आणि एनर्जी इतकी छान होती की पाहणारे थक्क झाले आणि त्यांनीच संपूर्ण महफिल गाजवली.

व्हिडीओमध्ये चार–पाच मुलं नवरीच्या मैत्रिणींसारखा लूक तयार करून स्टेजवर येतात. त्यांनी घूंघट टाकलेला असतो आणि म्युझिक सुरू होताच ते सगळे एकाच तालात, एकदम जुळून एकसारखे स्टेप्स करत डान्स सुरू करतात. त्यांचे चेहरे, हातांच्या हालचाली आणि घूंघट सांभाळत केलेला डान्स इतका मजेदार दिसतो की पाहताना कोणालाही हसू थांबत नाही.

स्टेजसमोर बसलेले पाहुणे त्यांचा डान्स बघून हसत-हसत खूश झाले. मुलांनी फक्त मजा करण्यासाठी नाही, तर खरंच मुलींसारखं नीट डान्स करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या स्टेप्स, हालचाली आणि चालण्यावरून कळतं की त्यांनी आधी चांगली तयारी केली होती. मागे उभे असलेले त्यांचे मित्रही जोरात टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून तो लगेच व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला आणि हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं, “यांनी तर नवरीच्या मैत्रिणींनाही मागे टाकलं!” तर दुसऱ्याने म्हटलं, “लग्नात असे मित्र असले की मजाच मजा होते.”

काही लोकांनी तर हा डान्स संपूर्ण लग्नाची खास गोष्ट असल्याचं सांगितलं. “मुलं लग्नात मजा आणायला काहीही करू शकतात, हा व्हिडीओ त्याचं उत्तम उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रियाही दिसतात. अनेक जण हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहून शेअर करत आहेत. एकंदरीत, ‘घूंघट की आड़ से’ या गाण्यावर मुलांनी केलेला हा मजेदार डान्स सगळ्यांना खूप हसवतोय. अशी दोस्ती, अशी मस्ती आणि असा धमाल डान्स लग्नाला खरंच खास बनवतो!