आत्तापर्यंत तुम्ही लग्नाआधी आणि लग्नानंतरचे फोटोशूट अनेकदा पाहिले असेल. यादरम्यान, नवरा आणि नवरी फोटोशूटसाठी पोज देतात. या दरम्यान जोडपे त्यांच्या आवडत्या ठिकाणी जातात किंवा नृत्य करताना व्हिडिओ शूट करतात.यावेळी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो.काहीतरी वेगळ हटके करण्याचा नादात हे कपल नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. दरम्यान एक व्हिडीओ सशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये नवरीने फोटोशूटवेळी एक जबरदस्त स्टंट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विचित्र गोष्टी करू लागले आहेत. फोटोशूटसाठी नवरी नवाऱ्याच्या छातीवर उलटी उभी असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नवरी आपला एक पाय नवराच्या डोक्यावर ठेवून आणि दुसरा पाय नवराच्या गुडघ्यावर ठेवून जबरदस्त स्टंट करत आहे.

या दरम्यान नवऱ्याचा हात सोडून ती आपले दोन्ही हात हवेत वर करु लागते. या नवरीने तिच्या अजब स्टाईलमध्ये पोज देऊन यूजर्सना आश्चर्यचकित केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: फाडफाड इंग्रजी बोलणारे प्रोफेसर विकतायत मोमोज, अवघ्या २ तासात सगळे मोमोज होतात फस्त

‘ये करके दिखो…’ या गाण्यावर नवरीने असे स्टंट करताना फोटोशूट केले की, ती खाली पडेल असे सर्वांना वाटले. मात्र तिने परफेक्ट बॅलेन्स केलं. या संपूर्ण फोटोशूट दरम्यान, नवऱ्याने नवरीचे पाय हाताने घट्ट धरून उभा राहिला जेणेकरून तिचा तोल बिघडू नये. शा प्रकारे अनोखा स्टंट करत फोटोशूट करून वधू खाली उतरते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने लिहिलं की, ‘ती एक महिला आहे, ती काहीही करू शकते’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride perform stunt during weeding photoshoot on honey singh song video viral on social media srk