अवजड सामान उचलून नेणे, वृद्ध व्यक्तीस चालायला त्रास होणे, वेळ वाचवणे आदी अनेक गोष्टींवर उपाय म्हणून मोठमोठ्या इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा असते. जसजसं इमारतींचे माजले वाढू लागले तसतसं रोजच्या चढण्या-उतरण्यासाठी ‘लिफ्ट’ची सुविधा ही उपलब्ध होऊ लागली. पाच मजल्यांच्या इमारतींपासून ते अगदी वीस मजल्यांच्या इमारतींपर्यंत चढण्यासाठी नागरिकांना लिफ्टची गरज निर्माण झाली. या लिफ्टची सुविधा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच सोयीस्कर असते. पण,एका इमारतीत ही लिफ्ट कोणी वापरायची किंवा कोणी नाही यासाठी एक नोटीस लावण्यात आली आहे. हैदराबादमधील HITEC सिटी मधील एका इमारतीने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण - हैदराबादमधील एका इमारतीच्या लिफ्टमधील एक अजब नोटीस लावण्यात आली आहे. लिफ्टमध्ये पिवळ्या रंगाची नोटीस लावण्यात आली आहे आणि त्यावर लाल रंगाने मजकूर लिहिण्यात आला आहे. हा मजकूर इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिण्यात आला आहे. यामध्ये काही निवडक लोकांनी जर इमारतीच्या लिफ्टचा उपयोग केला तर त्यांना ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.नक्की कोणासाठी हा दंड असणार आहे व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा… हेही वाचा…‘आई-बाबांना …!’ मुंबईत भाड्याने घर घेणाऱ्या तरुणीची पोस्ट; घराची किंमत सांगत दिला ‘हा’ मोलाचा सल्ला पोस्ट नक्की बघा… पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, या नोटीसमध्ये घरकाम करणाऱ्या स्त्रिया, विक्रेते आणि ऑनलाईन ऑर्डर केलेलं सामान घरपोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉय यांना इमारतीची लिफ्ट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जर रहिवासी वापरतात ती मुख्य लिफ्ट वापरताना यांना पाहिलं तर मात्र या कामगारांना दंड आकारला जाईल आणि त्यांच्याकडून तब्ब्ल ५०० रुपये दंड वसूल केला जाईल ; असे सुद्धा यात नमूद करण्यात आले आहे; जे पाहून तुम्ही खरंच थक्क व्हाल. घरकाम करणाऱ्या स्त्रिया आणि ऑनलाईन ऑर्डर केलेलं सामान घरपोच करणारे डिलिव्हरी बॉय दिवसरात्र मेहनत करतात आणि इतरांना त्याच्या घरामध्ये काम करण्यास किंवा त्यांचे सामान घरपोच करण्यास मदत करतात. तरीही या कष्टाळू माणसांसाठी अशी नोटीस का लावण्यात आली असावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @ProfRavikantK या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अनेक नेटकरी ही पोस्ट पाहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, 'मी डिलिव्हरी बॉय असल्याने, मी पार्सल घेऊन जात असताना मला सर्व्हिस लिफ्ट वापरण्यास सांगण्यात आले' तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, 'शहरांतील अनेक इमारतींमध्ये ही गोष्ट सामान्य आहे आणि या मूर्खपणाचे समर्थन करण्यासाठी रहिवासी अत्यंत वाईट गोष्टी सांगतात आणि अशा गोष्टींच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही अशा गोष्टींवर कारवाई केली जात नाही' ; आदी विविध कमेंट पोस्टखाली पाहायला मिळाल्या आहेत.