Viral video: सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडीओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत, जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात. मात्र, कधीकधी अशा लोकांना परिणामांनाही सामोरे जावे लागते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका हळदीच्या कार्यक्रमाक बैलाच्या अंगावर पैसे उडवणं लोकांना चांगलंच महागात पडलंय.

​कल्याणमधील शीळ रोडवरील पडले गावातील पाटील कुटूंबाच्या हळदी मधील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.रविवारी रात्री पडले गावातील पाटील कुटूंबात हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी आपला बैल तेथे आणला आणि और्केस्ट्रावर बैलाचे गाणे लावत त्या बैलावर पैसे उडवायला सुरवात केली, यायचा राग बैलाला आला आणि तो उधळला, यावेळी बैल थेट बाजूलाच नाचत असलेल्या बायकांच्या अंगावर गेला. आजूबाजूला असणाऱ्या सर्वांना त्यानं तुडवलं अन् थेट स्टेजवर गेला. यामध्ये अनेकांना दुखापत झाली असणार.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हळदीचा कार्यक्रम सुरू आहे.तिथेच बाजूला बैलदेखील आहे. त्याला दोन लोकांनी पकडून ठेवलं आहे. दरम्यान, हे सगळं सुरू असताना अचानक बैलावर नोटा उधळण्यात येतात, यावळी बैल पिसाळतो आणि सैरभैर पळू लागतो. आजूबाजूच्याना खाली पाडत पुढे धावत गेला, यावेळी बैलाला पकडून उभे असलेले पडले.. यावेळी सर्वांचीच घाबरगुंडी उडाली.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ stuartlittle1252 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला, “बैलाला ध्वनिप्रदूषणाचा त्रास झाला. त्याने आपल्या पद्धतीने उपाय केला”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक युजर्स त्यावर कमेंटदेखील करत आहेत. बैल तापला, कर्म, जन्माची अद्दल घडली; अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी देत आहेत.