Optical Illusion viral photo: ऑप्टिकल इल्यूशन असलेले फोटो तुम्ही नक्कीच बघितले असतील. याला दृश्य भ्रम म्हणजे डोळ्यांची फसवणूक असेही म्हणतात. अनेक ऑप्टिकल इल्यूशन असे असतात, ज्याचे रहस्य सोडवताना लोकांचा कस लागतो. ऑप्टिकल इल्युजनचे गूढ उकलणे एकाच वेळी शक्य नाही. त्यासाठी त्या दृश्य भ्रमाकडे २-३ वेळा पहावे लागते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याचं उत्तर शोधण्याचा नेटीझन्स खूप प्रयत्न करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, या फोटोमध्ये काही आकडे दडलेले आहेत. ते आकडे कोणते आहेत याच शोधकार्य सुरु आहे. कुणी अमुक आकडे सांगतंय तर, कुणी काहीतरी वेगळचं सांगतंय. फोटोत आपण पाहू शकता की एक वर्तुळ आहे. त्याच वर्तुळात काही संख्या लिहिलेल्या आहेत.वर्तुळात लपलेला खरा क्रमांक फार कमी लोकांना सांगता आला आहे, तर बहुतांश लोकांनी चुकीचा क्रमांक सांगितला आहे.

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

हे मन हेलावणारे छायाचित्र @benonwine या आयडी नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे आणि प्रश्न विचारण्यात आला आहे की, तुम्हाला काही नंबर दिसतो का? तो दिसत असेल तर सांगा तो नंबर कोणता आहे? या व्हायरल फोटोला आतापर्यंत २.३ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर ११ हजाराहून अधिक लोकांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

(हे ही वाचा: रोहितला राग अनावर! भुवीने कॅच सोडताच चेंडूला मारली लाथ; Video Viral)

(हे ही वाचा: Video: UK च्या विमानतळावर तुफान वादळात एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; भारतीय पायलटचं होतंय कौतुक)

ट्विटर युजर्सनी हा फोटो पाहून वर्तुळात दडलेला नंबर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एका यूजरने ३४५२८३९ हा नंबर सांगितला आहे तर, दुसऱ्या यूजरने ५२८ असा नंबर दिला आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या युजरने ४५२८३ हा क्रमांक दिला आहे. तर एका यूजरने लिहिले आहे की, ‘मला ४५२८३ नंबर दिसत आहे, पण मला वर्तुळात आणखी दोन नंबर दिसत आहेत, पण ते नंबर कोणते आहेत हे मी सांगू शकत नाही’.

हे’ आहे उत्तर

वास्तविक ३४५२८३९ हा नंबर वर्तुळात लपलेला आहे आणि फक्त २-३ वापरकर्ते हा अचूक नंबर सांगू शकले आहेत. तुम्ही प्रयत्न करून पाहू पाहा तुम्हाला कोणते नंबर दिसतोय ते सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you tell the number hidden in this viral photo 99 percent of people fail ttg