आयुष्य हे फक्त आनंदी राहणे, हसणे किंवा मजा-मस्ती करण्यापूरते मर्यादीत नसते. आयुष्यात कधी कधी थोडे दुख: संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरा जातो तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडवतो. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. सध्या अशाच एका शाळकरी चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चिमुकल्याची कृती पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले आहे..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये शाळेत निघालेला एक चिमुकला दिसत आहे. डब्बा भरण्यासाठी चिमुकला चुलीजवळ येतो जिथे एक मिरच्यांचे टोपले, एक पातले आणि कढई झाकलेली दिसत आहे. चिमुकला त्याचा डब्बा उघडतो. पातलेल्यातील भात काढून डब्यात भरतो. भाजीसाठी तो कढई उघडतो तेव्हा कढईत भाजी नसल्याचं त्याच्या लक्षात येते पण तो कसलीही तक्रार न करता चुलीजवळी मिरचीचं टोपल ओढतो. एका कागदात चार पाच मिरच्या आणि थोडंस मीठ बांधतो. ते डब्यात भरून त्याचं झाकण लावतो. डब्बा दप्तरमध्ये ठेवतो. दप्तर पाठीवर घेऊ शाळेत जातो. व्हिडीओमध्ये चिमुकल्याची कृती पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. परिस्थिती वाईट अनेकांची असते पण फार कमी लोकांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते. हीच जाणीव या चिमुकल्याच्या कृतीमधून दिसली. भाजी संपलेली असताना त्याने काहीही तक्रार न करता निमूटपणे मीठ आणि मिरची खाण्याची तयारी दाखवली. चिमुकल्याने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. नेटकरी चिमुकल्याचे कौतूक करत आहे.

हेही वाचा – मेट्रोमध्ये बसल्या बसल्या काकांनी रंगवली संगीत मैफील, इतके सुंदर गाणे गायले प्रवासी ऐकतचं राहिले, Viral Video एकदा बघाच

हेही वाचा – “काळ आला होता पण…”, चालकाचे सुटले नियंत्रण अन् भरधाव वेगात थेट दुकानात शिरली बस, दोन महिला….. थरारक अपघाताचा Video Viral

व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “डोळे एकदम भरून आले भाऊ”

दुसरे म्हणाले, “आम्ही पण गरीबी अनुभवली आहे. मागचे दिवस आठवतात. अंगावर काटा आला हा व्हिडीओ पाहून पण एक मात्र खरं चांगले दिवस पण तोच देव घेऊन येतो”

तिसरा म्हणाला, “ज्यांना मिळतं त्याना कदर नसते आणि ज्यांना मिळत नाही त्यांना जाऊन विचारा मिरची भाकरी खाऊन देखील आंनदी कसं राहायचं. व्हिडीओमध्ये खूप शिकण्यासारखं आहे.”

चौथा म्हणाला,”ज्याला आईबापाच्या कष्टाची व परिस्थितीची जाणीव असते तो मुलगा कधीच वाया जात नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Circumstances in life will teach you everything the school boy eating salt and chilli in tiffin video viral snk