Eknath Shinde Malanggad Aarti: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडिओ सोशल मीडिया वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले होते की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील हाजी अली दर्ग्यात गेले होते आणि त्यांनी तिथे भगव्या रंगाची चादरही अर्पण केली होती. शिंदेंनी तिथे आरती केल्याचा दावा करण्यात येत होता. नेमका हा प्रकार काय व त्यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

X युजर Professor (Dr) K K Pandey ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून स्क्रीनग्रॅब मिळवून आमचा तपास सुरु केला. रिव्हर्स इमेज सर्च दरम्यान आम्हाला एक पोस्ट सापडली.

मुंबईतील हाजी अली दर्ग्यात नव्हे तर ‘आरती’ करण्यासाठी मलंगगडला एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आम्हाला या बद्दल एक बातमी देखील सापडली.

महेश पाटील यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर आरती करत असल्याचा व्हिडीओ सुद्धा आम्हाला आढळला.

व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती हे महेश पाटीलच होते जे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आरती करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडावर आरती करत असल्याच्या अनेक व्हिडीओ स्टोरी देखील आम्हाला आढळल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मलंगगडचा मुद्दा उचलून धरला होता, मलंगगड हा हिंदू मंदिराचा भाग असल्याचे म्हणत हे ठिकाण मुक्त करण्यासाठी शिंदेंनी शपथ घेतली होती. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे अनेक दशके जुन्या वादाला तोंड फुटले होते. .

https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-chief-minister-eknath-shinde-haji-malang-dargah-kalyan-2484202-2024-01-04

मलंगगड हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांच्याशी संपर्क साधला ज्यांनी पुष्टी केली की हा व्हिडिओ मलंगगडचा आहे जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली होती.

हे ही वाचा<< “जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?

निष्कर्ष: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मलंगगडावर आरती करतानाचा जुना व्हिडीओ अलीकडचा असल्याचे सांगत, मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील असल्याचा दावा करत व्हायरल होत होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde haji ali darga aarti video kesariya chadar but reality is different shinde was actually at malanggad check facts svs
First published on: 17-04-2024 at 17:39 IST