Amir Khan Video Supporting Congress: लाइटहाऊस जर्नालिझमला बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे लक्षात आले. देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये असलेच पाहिजेत, जर त्यांच्याकडे ही रक्कम नसेल तर ती कुठे गेली असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, असं आमिर खान व्हिडिओमध्ये म्हणत असल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या प्रचारासाठी या पोस्टचा वापर केला जात असून आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Mini Nagrare ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता.
इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडिओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आमचा तपास सुरू केला. याद्वारे आम्हाला कळले की हा व्हिडिओ सत्यमेव जयते या शोच्या एपिसोड 4 चा प्रोमो आहे.
हा व्हिडिओ सात वर्षांपूर्वी सत्यमेव जयतेच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला होता. यात आमिर खान १५ लाख रुपयांबद्दल बोलताना दिसत नाही.
आम्ही या व्हायरल व्हिडिओमधून ऑडिओ काढला आणि तो IIT जोधपूरच्या सहकार्याने विकसित केलेल्या AI डिटेक्शन टूल itisaar.ai द्वारे तपासला. या ऑडिओच्या विश्लेषणानंतर प्राप्त झालेल्या अहवालात म्हटले आहे की हा ऑडिओ ‘एआय जनरेटेड व्हॉईस स्वॅप’ आहे.
आमिर खानने व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्याची बातमी देखील आम्हाला आढळली.
आमिर खानच्या प्रवक्त्याने बातमीत सांगितले आहे की, “आमिर खान एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप करणाऱ्या अलीकडील व्हायरल व्हिडिओमुळे आम्ही घाबरलो आहोत. आमिर स्पष्ट करू इच्छितो की हा एक बनावट व्हिडिओ आहे आणि पूर्णपणे खोटा आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली असून या प्रकरणाशी संबंधित विविध प्राधिकरणांकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे.”
निष्कर्ष: आमिर खानचा व्हिडीओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओ एआय निर्मित केलेल्या आवाजाने ओव्हरलॅप केला असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. आमिरने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा व्हायरल दावा खोटा आहे.