Viral video: किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिहारमधील सहरसा येथील एका तरुणीला विषारी सापासंह डान्स करणे महागात पडले. लाइव्ह शो कार्यक्रमादरम्यान या महिलेला विषारी कोब्राने दंश केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला स्टेजवर साप गळ्यात अडकवून डान्स करत आहे. या महिलेचा डान्स पाहण्यासाठी गावकरीही जमल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी अचानक नाचता नाचता महिला गोल गोल फिरुन जोरात स्टेजवर कोसळते. यावेळी तिथे उपस्थित सगळे तिला उचलून स्टेजच्या मागे घेऊन जाताना दिसत आहेत. अशाप्रकारे विषारी सांपासोबत खेळ केल्यावर अशाप्रकारे त्याचे परिणाम भोगावे लागतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO

@arjunsaifai2002 नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘प्लिज एवढी रीस्क घेऊ नका’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cobra bite while performing a dance shocking video goes viral on social media srk