Coldplay concert in flight: कोल्ड प्ले हा जगभरात नावाजला गेलेला बँड. मुंबईत सध्या ‘कोल्ड प्ले’ फिव्हर पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टचे आयोजन नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये १८, १९ व २१ जानेवारी असे तीन दिवस करण्यात आलं होतं. १८ व १९ तारखेचे कॉन्सर्ट सुपरहीट ठरल्याचं पाहायला मिळालं. आता या कॉन्सर्टचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत.‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टसाठी देशभरातील हजारो संगीतप्रेमी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर नवी मुंबईत आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान ‘कोल्ड प्ले’ या बँडच्या या कॉन्सर्टची तिकीट मिळवण्यासाठी अनेजण धडपड करत होते. कित्येकांनी दुप्पट ते तिप्पट अशा चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले. विशेष म्हणजे, बेकायदेशीररित्या चढ्या दराने तिकीटाची विक्री होत असतानाही अनेकजण हे तिकीट खरेदी करण्यासाठी इच्छुक होते. अनेकांना भरमसाठ रक्कम देऊनही तिकीटं मिळाली नाहीत. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण आकाशात अनोखा कोल्ड प्ले कॉन्सर्ट रंगलेला पाहायला मिळाला.

आकाशातील मैफील

कोल्डप्लेच्या कामगिरीची जादू केवळ स्टेडियमवरच राहिली नाही – ती हवेतही उडाली! आता व्हायरल झालेला व्हिडिओ इंडिगोचे कॅप्टन प्रदीप कृष्णन यांचा पुणे-अहमदाबाद फ्लाइटमधला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॅप्टनने गंमतीने विचारले, “तुमच्यापैकी कितीजण कोल्डप्ले कॉन्सर्टला जाणार आहेत? तुमच्यापैकी किती जणांकडे दोन अतिरिक्त तिकिटे आहेत?” यावेळी सगळ्याचं प्रवाशांमध्ये आनंद आणि हशा पिकला. त्यानंतर कॅप्टनने आपण इथेच कोल्ड प्ले कॉन्सर्ट सुरु करु असं सांगितलं आणि पुढच्याच क्षणी सर्व प्रवाशांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च चालू केल्या.यानंतर एकच उत्साह आणि आनंद सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.

पाहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट पाहायला अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून चाहते आले होते मात्र मुंबईतल्याच काही तरुणांनी कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट संपल्यानंतर थेट मुंबई लोकलमध्ये कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट सुरु केला याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.कोल्डप्लेने त्यांच्या “म्युझिक ऑफ द स्फिअर्स” टूरचा मुंबईचा पहिला टप्पा डीवाय पाटील स्टेडियमवर तीन दिवसांच्या संगीतमय प्रदर्शनासह गुंडाळला आणि लाखो चाहत्यांना अविस्मरणीय आठवणी देऊन गेल्या. पण जादू तिथेच संपली नाही – मैफिलीनंतरची चर्चा शहरात पसरली आणि मुंबई लोकल ट्रेनमध्ये अनपेक्षितपणे एक घटना घडली. या व्हिडीओमध्ये उत्साही चाहते लोकलमध्येच मोठ मोठ्यानं गाताना दिसत आहेत. “खरा कोल्डप्ले कॉन्सर्ट म्हणजे घरी परतणारी ट्रेन होती.” असं कॅप्शन व्हिडीओ शेअर करताना युजरने दिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coldplay concert in flight indigo pilot turns ahmedabad flight into a coldplay concert wows passengers with sky full of stars srk