Trending Video:  सोशल मीडियावर हल्ली असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पाहताना आपल्याला लाज वाटते. यात जोडपे ठिकाण, वेळ न बघता कुठेही अश्लील कृत्य करताना दिसतात, जे पाहताना दुसऱ्यांना लाज वाटते. मागील काही दिवसांपासून दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोत अशाचप्रकारे कपल अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात आता एका बसमधील व्हिडीओची भर पडली आहे. ज्यात एक जोडपं भरबसमध्ये मागच्या सीटवर बसून असे काही विचित्र कृत्य करत होते, ज्यामुळे शेजारी बसलेल्या महिलेला लाजेने आपली मान फिरवून बसण्याची वेळ आली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसच्या मागच्या सीटवर एकमेकांच्या शेजारी बसलेलं कपल असे काही कृत्य करू लागले की, जे पाहून तुम्हीही म्हणाल, यांना लाजा वाटत नाही का? हे दोघे आपल्या आजूबाजूला इतर प्रवासी आहेत हे जणू विसरूनचं गेले होते. बेडरूममध्ये असल्यासारखे त्यांचे वर्तन होते. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता अनेकांना धक्का बसला आहे.

पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बसच्या सर्वात मागच्या सीटवर बसलेले एक कपल एकमेकांना किस करून अश्लील कृत्य करत आहे. यावेळी तरुणी सीटवर नाही तर चक्क तरुणाच्या मांडीवर बसली होती, काही मिनिटे त्यांचा हा प्रकार सुरू होता, यावेळी त्यांच्या बाजूला एक वृद्ध महिला बसली होती. मात्र, कपलचे हे घाणेरडे कृत्य पाहून लाजेने ती दुसऱ्या दिशेला तोंड करून बसली. या जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे सर्व अतिशय घृणास्पद होते. हा व्हिडीओ पाहून युजर्सही संतापले असून त्यांनी या जोडप्याला चांगलेच फटकारले आहे.

कपलच्या अश्लील कृत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

एक्ससह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला; तर अनेकांनी व्हिडीओला लाइकही केले आहे. यावर युजर्स कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, “सर्वात बेशरम ते लोक आहेत, जे बसमध्ये बसून हे सर्व घडताना पाहत आहेत. दोघांच्याही कानाखाली वाजवली पाहिजे होती.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “या प्रकरणाची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करा, सार्वजनिक ठिकाणी हे सर्व करणे कितपत योग्य आहे, याचा जनतेवर चुकीचा प्रभाव पडतो.” तर तिसऱ्या युजरने लिहिले की, “अशा लोकांमुळेच या युगाला कलियुग म्हणतात.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple caught kissing and indulging in obscene act in crowded crut bus in odisha video goes viral sjr
First published on: 14-05-2024 at 16:18 IST