MS Dhoni : सध्या देशात ‘आयसीसी’ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. सोशल मीडियावर अनेक क्रिकेटर्सचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. अशात माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी सुद्धा चर्चेत आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी सध्या तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.एकीकडे विश्वचषक सुरू असून दुसरीकडे धोनी पत्नी साक्षीबरोबर वडिलांच्या गावी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्याचे गावातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी गावातील लोकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. त्याचे चाहते नेहमी त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सूक असतात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की धोनी सुद्धा त्यांचे मन न दुखवता त्यांच्याबरोबर फोटो काढताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला धोनीची माणूसकी सुद्धा दिसून येईल. व्हिडीओत एक वयोवृद्ध महिला खाली बसलेली असते तेव्हा धोनी स्वत: तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिच्याबरोबर फोटो काढतो. नंतर त्याची पत्नी साक्षी सुद्धा या वृद्ध महिलेजवळ येऊन फोटो काढते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हेही वाचा : शिवरायांची लेक जणू…! अवघ्या दोन वर्षाची चिमुकली चढली भिंतीवर, व्हायरल होतोय VIDEO

Mufaddal Vohra या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावातील चाहत्यांबरोबर धोनी. धोनी…काय व्यक्तिमत्त्व आहे!”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपला माणूस, तुझ्यासारखा कोणी होऊ शकत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून असे वाटले की ही धोनीची खरी आजी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, ” याला म्हणतात संस्कार” धोनीच्या चाहत्यांनी व्हिडीओ पाहून धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer ms dhoni sat near old woman and took a picture sanskar and humanity of mahendra singh dhoni video at village goes viral ndj