Mumbai local Shocking video: असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईची लोकल आहे. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. याचं कारण असं की, आज कॉटन ग्रीनहून सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असं नेमकं घडलं तरी काय? तर झालं असं की, सकाळी कॉटन ग्रीनहून सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनमध्ये महिला डब्यात एक किळसवाणा प्रकार पाहायला मिळाला. संपूर्ण महिला डब्यात कुणी अज्ञात व्यक्तीनं विष्ठा लावली होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सीटवर, खांबाला, संपूर्ण डब्यात आजूबाजूला विष्ठा लावली होती. काही महिला जिथे घाण नाही तिथे बसल्या आहेत, मात्र बऱ्याच ठिकाणी किळसवाणा प्रकार केल्याचं दिसतं आहे. यावेळी एका प्रवासी तरुणीनं याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. या किळसवाण्या प्रकारानंतर सर्व यावर संताप व्यक्त करत आहेत.

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीच लोकल ट्रेन अनेकांसाठी दुसरं घर आहे.आणि अशाप्रकारे अज्ञाताने केलेल्या कृत्यामुळे लोक संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “कितीही सोयी-सुविधा दिल्या तरी लोक कधी सुधारणार नाही”, तर दुसरा म्हणतो, “सीसीटीव्ही तपासा आणि अटक करा अशा लोकांना” तर आणखी एकानं, अशा लोकांना फटके दिले पाहिजेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.