Lion viral video: सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याच्या ताकदीपुढे हत्ती सारखा बलाढ्य प्राणी सुद्धा झुकतो. वाघ कितीही खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जात असला, तरी तो सिंहाशी पंगा घेत नाही. आतापर्यंत आपण सर्वांनी सिंहाचं रौद्र रुप पाहिलं आहे मात्र सध्या समोर आलेल्या सिंहाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. त्याच्या आयाळाचे केस जेव्हा हवेवर झुलतात तो नजारा खरंच पाहण्यासारखा असतो. त्यावेळी सिंहाचा वेगळाच स्वॅग जाणवतो. पण सध्या सोशल मीडियावर असा एक सिंह चर्चेत आहे ज्याच्या केसांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेय. गंमत म्हणजे सिंहाचे केस अगदी सरळ असतात पण हा सिंह मात्र कुरळ्या केसांचा आहे. होय, या सिंहाचे केस हे नैसर्गिररित्या कुरळे आहेत. त्यामुळे तो जणू एकाद्या हॉलिवूड चित्रपटातल्या हिरोसारखा दिसतो.
जंगलाचा राजा, सिंह, त्याची शाही चाल आणि सुंदर केसांसाठी ओळखला जातो. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक अलीकडील व्हिडिओ या सिंहाला इतरांपेक्षा वेगळे करतो. व्हिडिओमध्ये, एक सिंह जंगलात ऐटीत फिरताना दिसत आहे. परंतु त्याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कुरळे केस. सिंहांचे केस सामान्यतः सरळ असतात, परंतु या व्हिडिओमधील सिंहाची केशरचना खरोखरच उल्लेखनीय आहे. त्याची ही नवीन हेअरस्टाईल यूजर्सना चांगलीच आवडली असून लोक अक्षरश: त्याच्या या नव्या लूकच्या प्रेमात पडले आहेत. असे मानले जाते की ही कुरळी हेअरस्टाईलहवेतील आर्द्रता आणि पावसात भिजल्यानंतर हवेत सुकल्याने असू शकते.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ silent_whispers.photography या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक वेळा हा फोटो पाहिला गेला आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो खूप गोंडस आहे. मला अजूनही त्याच्यात त्याच्या शावकाचा चेहरा दिसतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो या हेअरस्टाईलमध्ये सुंदर दिसत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो खूपच देखणा दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाला यासाठी मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही”.
