Dangerous Accident Video Massive Boulder Crashes Inside A House | Loksatta

दैव बलवत्तर म्हणून वाचले महिलेचे प्राण; एक पाऊल पुढे टाकले असते तर… Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल

फक्त एका सेकंदाच्या फरकाने महिलेचे जीव वाचले… Viral व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

dangerous accident video
photo:social media

अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ धोकादायक असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. या व्हिडिओमध्ये एका महिलेचा जीव फक्त काही सेकंदाच्या फरकाने वाचला आहे. या महिलेने एक तरी पाऊल पुढे टाकलं असतं तर जीव गमावला असता. नशीब सोबत असेल तर काहीही होऊ शकत नाही, हा व्हिडीओ पाहून तुम्ही हेच म्हणाल.

ही घटना अमेरिकेत घडली आहे. याठिकाणी रविवारी रात्री एका घरावर मोठा दगड पडला. हा दगड इतका जोरात पडला की समोरच्या सगळ्या वस्तूंचा चुरा झाला. दगड पडला तेव्हा ही महिला देखील चिरडणार होती. पण काही सेकंदाच्या फरकाने महिलेचा जीव वाचला. दगड घरात पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा दगड इतक्या जोरात पडला की भिंत तोडून बेडरुममधून दगड लिविंग रुममध्ये घुसला. ही महिला टीव्ही पाहण्यासाठी सोफ्याकडे जात असताना दगड अचानक आत आला. मात्र कॅरोलिन सासाकी नावाची ही महिला नशिबाने वाचली.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: भररस्त्यात बेभान नाचत होतं जोडपं; सरकारने १० वर्षांची शिक्षा सुनावली, पाहा Video)

हा दगड कशामुळे घरावर पडला हे अजून समजले नाही आहे. मात्र मुसळधार पावसामुळे त्याची माती खचून वाहून गेली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 11:55 IST
Next Story
…अन् आजोबांनी चक्क शेळ्यांनाच गाडीला जुंपलं, देशी जुगाडाचा Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल