Viral Video : असं म्हणतात, माणूसकी हाच खरा धर्म आहे. सोशल मीडियावर माणूसकी दाखवणाऱ्या लोकांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणाला आर्थिक मदत करताना दिसून येतात तर कधी कोणी कुणाच्या दु:खात सहभागी होताना दिसून येतात. हे व्हिडीओ पाहून कधी कधी “हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ही सुंदर प्रार्थना आठवते.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाविकांनी वृद्ध महिलेला देवाच्या दर्शनासाठी उचलून मंदिरात नेले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ जगन्नाथ पुरी मंदिरातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका वृद्ध महिलेला चालता येत नाही तेव्हा एक गृहस्थ या वृद्ध महिलेला उचलतात आणि त्यांच्या अवती भोवती दर्शनासाठी आलेले भाविक जमा झालेले या व्हिडीओमध्ये दिसून येईल. ते सुद्धा मदत करतात आणि या महिलेला जगन्नाथाच्या दर्शनासाठी घेऊन जातात.हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हाच खरा माणूसकी धर्म आहे, असे वाटेल.
ओडिशामध्ये असलेले जगन्नाथ मंदिर हे प्रभू विष्णूचे मंदिर आहे. दर दिवशी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. जगन्नाथ मंदिर हे भारतातील एक ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे. हिंदू धर्माच्या चार धामापैकी हे एक मंदिर आहे. जगन्नाथ पुरी मंदिराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक भक्त जगन्नाथ पुरीचे व्हिडीओ शेअर करताना दिसून येतात.

हेही वाचा :

johnpurijagannathdham या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक प्यार का नगमा है” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मानवता हाच खरा धर्म” तर एका युजरने लिहिलेय, “देवा, या वृद्ध महिलेला आशीर्वाद दे” काही युजर्नसी वृद्ध महिलेला दर्शनासाठी उचलून नेणाऱ्या भाविकांचे कौतुक केले आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर “जय जगन्नाथ” असा जयघोष केला आहे.