Dil Se Bura Lagta Hai Meme Boy Devraj Patel Dies: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार ‘दिल से बुरा लगता है’ मीममधील तरुण देवराज पटेल याचे निधन झाले आहे. अवघ्या २१ वर्षीय देवराजने रस्ते अपघातात जीव गमावला आहे. भूपेश बघेल यांच्या ट्वीटनंतर अनेकांनी देवराजच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील शेवटचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. २६ जूनला आज साधारण दुपारी १ च्या सुमारास देवराजने आपला शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला होता. प्राप्त माहितीनुसार तो नवे रायपूर येथे आज रील शूट करण्यासाठीच गेला होता जिथून परत येताना त्याचा अपघात झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवराज पटेलचे मीम भारतातच नव्हे तर जगभरात प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याने बीबी के वाईन्स फेम भुवन बामसह ढिंढोरा या वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केले होते. सध्या तो छत्तीसगड मध्ये राहूनच बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांना धक्का बसला असून त्याच्या व्हिडीओ व फोटोवर अनेकजण श्रद्धांजली वाहत आहेत. लेकिन दोस्तो मे क्युट हूँ असे कॅप्शन देत त्याने शेवटचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात त्याने म्हटलेला बाय शब्द ऐकून अनेक चाहते जण भावुक झाले आहेत. देवराजचे इंस्टाग्रामवर तब्बल ५५ हजार फॉलोवर्स आहेत.

देवराज पटेल इंस्टाग्राम

हे ही वाचा<< ‘दिल से बुरा लगता है’ मीममधील देवराज पटेलचे निधन; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे ट्वीट

दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजचा व्हिडीओ पोस्ट करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. या व्हिडिओमध्ये देवराज पटेल, “छत्तीगड मध्ये दोनच लोक फेमस आहेत एक मी आणि एक म्हणजे आमचे काका” असे म्हणताना दिसत आहे. तर “एवढ्या लहान वयात अतुलनीय प्रतिभेच्या कलाकाराला गमावणे अत्यंत दुःखद आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती.” असे बघेल यांनी लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dil se bura lagta hai meme boy devraj patel dies in accident devraj instagram video saying bye goes viral svs