सोशल मीडियावर मैत्रीचे एकाहून एक अनेक किस्से ऐकायला किंवा पाहायला मिळतात. यातील अनेक गोष्टी तुम्हाला भावूक करणाऱ्या असतात. मित्र-मैत्रिणींचा विषय आला की, आपल्या डोळ्यासमोर शाळा, कॉजेलमधील ते जुने दिवस आठवतात. मित्रांमधील भांडणं, कॉलेजला मारलेली बंक, परीक्षेत केलेली कॉपी आणि वेळेप्रसंगी एकमेकांना केलेली मदत, मैत्रीचे असे अनेक किस्से तुम्ही अनुभवले असतील. अशाच मैत्रीचा एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याच एक मित्र दुसऱ्या मित्राचा हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी बर्फाने गोठलेल्या पाण्यात उडी मारतो.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक एका गोठलेल्या तलावाभोवती उभे आहेत. यातील एका व्यक्तीच्या शरीराभोवती दोरखंड बांधलेले आहे. जो बर्फाळलेल्या तलावातील एका छिद्रातून आत जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळात तो त्या बर्फाळ पाण्यात उडी मारतो. यानंतर काही वेळाने त्याच्या आजूबाजूला उभे असलेले इतर लोक त्याला बाहेर काढतात. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मित्राचा फोन गोठलेल्या तलावात हरवला, त्यामुळे त्याचे मित्र परत मिळवण्यासाठी त्याची मदत करत आहेत.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता जो आता खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत त्याला सुमारे 42,000 अपव्होट मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. जे कमेंट्सद्वारे आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, प्रत्येकाला असा विश्वासू मित्र मिळायला हवा. पण बर्फाळलेल्या तलावात डुबकी मारण्याची ही कल्पना सर्वांना आवडली नव्हती.

एका युजरने लिहिले की, मला त्याच्या सुरक्षेची काळजी वाटते. पण ते खूपच मजेदार आहे. अशी मज्जा मित्रांमध्ये घडते असते, परंतु सुरक्षितता लक्षात ठेवली पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की, तो माणूस चांगला मित्र आहे. मात्र, पाण्यातून बाहेर आल्यानंतर फोन चालणार नाही, हेही त्यांना माहीत आहे. पण व्हिडिओ मस्त आहे.